‘पीएमपी’च्या १० हजार कामगारांना मिळणार प्रत्येकी १७ हजार रूपये बोनस

गेल्या आठवड्यात स्थायी समितीने पीएमपी कामगारांना बोनससाठी २४ कोटी रुपये द्यावेत असा ठराव केला होता.
Pmpl Bus
Pmpl BusSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहा हजारहून अधिक कामगारांना अखेर ऐन दिवाळीत का होईना पण बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमपीला देण्यात येणाऱ्या संचलन तुटीतील तरतुदीतून उचल देण्याचा निर्णय आज महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला. त्यामुळे येत्या दोन दिवसात ‘पीएमपी’च्या १० हजार कामगारांना प्रत्येकी १७ हजार रूपये बोनस मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीने पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी रुपये द्यावेत असा ठराव केला होता. ‘पीएमपी’ तोट्यात असल्याचे सांगून आयुक्तांनी बोनस देण्यास नकार दिला असता त्यांना २०१७ मध्ये औद्योगीक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखल देऊन बोनस दिला पाहिजे असे सांगितले. त्यानंतर आज आयुक्तांनी स्थायी समिती समोर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यास तातडीने मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक कामगाराच्या खात्यावर १७ हजार रुपये जमा होणार असल्याने दिवाळीच्या पूर्वसंधेला कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’

Pmpl Bus
कोरोना लसीकरणात पुणे राज्यात दुसऱ्या स्थानी

महापालिकेकडून पीएमपीला मोफत व सवलतीच्या दराचे बस पासचे दरवर्षी पैसे दिले जातात. याच रकमेतून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. पण गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पीएमपी बस बंद असल्याने पासेसची रक्कम केवळ ३ कोटी ८ लाख रुपये इतकी झाली होती. त्यामुळे या रकमेतून कर्मचाऱ्यांना बोनस देता येणार नव्हता. उर्वरित २१ कोटी रुपये कोणत्या तरतुदीची उपलब्ध करायची यावरून संभ्रम निर्णय झाला, त्यामुळे गेले आठवडाभर या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनस विना होती की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. यावरून पीएमपी कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना भेटून बोनस देण्याची मागणी केली.

Pmpl Bus
‘सीआयडी’ मालिका पाहून पंधरा वर्षीय मुलांनी केला वृद्धेचा खून

आयुक्तांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे अवलोकन करून बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी २१ कोटी रुपयांची उचल देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही रक्कम २०२१-२२ च्या संचलन तुटीच्या तरतुदींमधून समायोजित करण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com