इंधन दर कपातीमुळे देशभरातील पेट्रोल पंपचालकांचे १२ हजार कोटी पाण्यात

गेले सहा महिने पेट्रोल व डिझलचे दर सातत्याने वाढत होते.
Petrol, Diesel Rates
Petrol, Diesel RatesSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पेट्रोल-डिझलच्या दरात अचानक करण्यात आलेल्या कपातीचा फटका देशभरातील पंपचालकांना बसला आहे. अचानक दर कमी करण्यात आल्याने राज्यातील पाच हजार पंपचालकांचे सुमारे शंभर कोटी तर देशभरातील ६० हजार पंपचालकांचे सुमारे १२ हजार कोटी रूपये पाण्यात गेले आहेत.

गेले सहा महिने पेट्रोल व डिझलचे दर सातत्याने वाढत होते. दरवाढीवरून देशभरात असंतोष निर्माण झाला होता. लोकांच्या मनातील राग कमी करण्यासाठी पेट्रोल सहा रूपये तर डिझल ११ रूपये प्रतिलिटरने कमी करण्यात आले.पोटनिवणुकात केंद्रातील भारतीय जनता पक्षाला बसलेला फटका हे तातडीने दर कमी करण्याचे कारण सांगितले जात असला तरी या निर्णयाने सामान्य माणसाला थोडा आधार मिळाला आहे.

Petrol, Diesel Rates
रेल्वे-बँकिंग, पोलीस आणि ‘एलआयसी’च्या भरतीसाठीही आता मिळणार विद्यावेतन

दिवाळीच्या सुटीमुळे बँका दोन दिवस बंद राहणार होत्या. शिवाय पंपांना इंधन पुरवठा करणाऱ्या डेपांनादेखील सुटी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश पंचचालकांनी पेट्रोल-डिझलचा साठा करून ठेवला होता. मात्र, अचानक दर कपात करण्यात आल्याने लाखो लिटर पेट्रोल व डिझल आता आणलेल्या किमतीपेक्षा अनुक्रमे सहा रूपये व अकरा रूपये कमी दराने विकावे लागणार आहे.

Petrol, Diesel Rates
‘पीएमपी’च्या १० हजार कामगारांना मिळणार प्रत्येकी १७ हजार रूपये बोनस

अचानक करण्यात आलेल्या दरकपातीमुळे पंपचालकांची स्थिती अतिवृष्टीत सापलेल्या शेतकऱ्यांसांरखी झाली आहे, असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात वाढलेल्या दराचा विचार केली तरी आजच्या दरकपातीने पंपचालक नुकसानीत आहेत. गेल्या सहा महिन्यात सातत्याने वाढलेल्या दरातून मिळालेल्या पैशांपेक्षा कितीतरी अधिक पैसे अचानक करण्यात आलेल्या दरकपातीने पंपचालकांच्या खिशातून काढून घेण्यात आले आहेत, असे दारूवाला यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने काल केलेल्या दरकपातीनंतर देशातील बारा राज्यांनीदेखील आपपल्या पातळीवर इंधनावरील कर कमी केल्याने पेट्रोल आणखी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या दरकपातीनंतर या बारा राज्यांनी ज्याप्रकारे सकारात्क प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद राज्य सरकार कधी देणार, असा प्रश्‍न आता नागरीकांकडून विचारण्यात येऊ लागला आहे. ज्या प्रकारे केंद्राने दरकपात केली त्याप्रकारे राज्य सरकार दरकपात करू शकते. मात्र, त्यासाठी राज्यातील नेतृत्वाची राजकीय इच्छाशक्ती आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com