रेल्वे-बँकिंग, पोलीस आणि ‘एलआयसी’च्या भरतीसाठीही आता मिळणार विद्यावेतन

राज्यातील बार्टीच्या ३० प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
धनंजय मुंडे
धनंजय मुंडेसरकारनामा
Published on: 
Updated on: 

पुणे : अनुसूचित जातीच्या (एससी) युवक युवतींना नेकरी-रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी राज्यात मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती, ‘एलआयसी’सह इतर क्षेत्रातील नोकरीसाठी प्रशिक्षण दिले जाणार असून, दरमहा सहा हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

बँकिंग, रेल्वे, एलआयसी तसेच पोलिस, मिलिटरी भरती आणि ॲप्टिट्युड टेस्ट यावर आधारित खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्कृष्ट नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाने आदेश जारी केला असून, प्रशिक्षणाची जबाबदारी ‘बार्टी’वर सोपवण्यात आली आहे.

धनंजय मुंडे
‘पीएमपी’च्या १० हजार कामगारांना मिळणार प्रत्येकी १७ हजार रूपये बोनस

राज्यातील ३० प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये बँकिंग, रेल्वे, एलआयसी परीक्षांचे प्रशिक्षण सहा महिने कालावधीचे असेल. पोलिस व मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण चार महिन्यांचे असेल. या विद्यार्थ्यांना प्रती महिना सहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल. यामुळे विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी खोली करून अभ्यास करू शकतील.

धनंजय मुंडे
कोरोना लसीकरणात पुणे राज्यात दुसऱ्या स्थानी

पोलीस, मिलिटरी भरतीच्या विद्यार्थ्यांना बूट आणि इतर साहित्य खरेदीसाठी अतिरिक्त तीन हजार रुपये दिले जातील. राज्यात प्रत्येक वर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून किमान १८ हजार विद्यार्थी प्रशिक्षित केले जाणार आहेत. त्यानुसार पुढील पाच वर्षांत ९० हजार युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यास मदत होणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com