पुणे जिल्हा बॅंक निवडणूक : तीन तालुक्यांत चुरस; भाजपचे दोन ठिकाणी आव्हान

पुणे जिल्हा बॅंकेत (PDCC) हवेली, मुळशी आणि शिरूर तालुक्यांतील निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश
Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Ashok pawar

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Ashok pawar

Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांना दिलासा मिळाला. बॅंकेच्या २१ संचालक पदांपैकी १४ जण बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सात जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. त्यातही `अ` गटातील हवेली आणि मुळशी या दोन तालुक्यांतील लढत लक्षवेधी राहिल.

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Ashok pawar

सहा आमदार पोहचले जिल्हा बॅंकेत सातवे पवार मात्र अडकले निवडणुकीत...

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के यांची हवेलीमधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास दांगट यांच्याशी लढत आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केले आहे. दुसरीकडे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (मुळशी) यांचा सामना सुनील चांधेरे यांच्यात होत आहे. शिरूरमध्ये आमदार अशोक पवार यांच्यासमोरील आव्हान कायम राहिले असून त्यांनाही आपली निवड बिनविरोध करण्यता अपय़श आले. त्यामुळे या तीन ठिकाणी मोठी चुरस नजरेस पडणार आहे. खेड तालुक्यात दर वेळी मोठी चुरस या निवडणुकीत दिसते. पण या वेळी तेथे आमदार दिलीप मोहिते यांचे विरोधक शरद बुट्टे पाटील आणि हिरामण सातकर यांनी माघार घेतली. त्यामुळे मोहिते यांचा बिनविरोधच मार्ग सुकर झाला. याशिवाय इंदापूर, जुन्नर येथील निवडीही बिनविरोध झाल्या.

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Ashok pawar

अजित पवारांनी तिढा सोडवला : संजय काळे जिल्हा बॅंकेवर बिनविरोध

याशिवास सोसायटी-नागरी बॅंक (क) मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (भाजप) विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते सुरेश घुले (राष्ट्रवादी) अशी लढत आहे. येथे दिलीप मुरकुटे यांनीही अर्ज भरला आहे. अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे विरुद्ध दादासाहेब फराटे असे एकमेकांच्या विरोधात आहेत. महिलांसाठीच्या दोन जागांसाठी आशा बुचके, पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे अशा तिघीजण रिंगणात आहेत.

Ajit pawar-Dattatray Bharane-Dilip Mohite-Ashok pawar

अखेरच्या क्षणी दत्तात्रेय भरणे अन् जगदाळे बिनविरोध...

पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील (आंबेगाव-शिरुर), अजित पवार (बारामती), संग्राम थोपटे (भोर), दिलीप मोहिते (खेड), संजय जगताप (पुरंदर) आणि दत्तात्रेय भरणे (इंदापूर) अशा सहा तालुक्यांतून सहा विद्यमान आमदार जिल्हा बॅकेवर संचालक म्हणून बिनविरोध म्हणून नियुक्त झाले. विशेष म्हणजे माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष रमेशआप्पा थोरात (दौंड) यांनीही आपले संचालकपद बिनविरोध करवून घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com