26/11 चा कट पाकिस्तानात शिजला ; उज्वल निकम म्हणाले...

UJJwal Nikam : सकाळ साप्ताहिकाच्या ३६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात निकम बोलत होते.
Ujjwal Nikam
Ujjwal Nikam Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांवर वेगवेगळे आरोपपत्र दाखल करण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. पण एकाच कटाचा भाग असलेल्या अतिरेक्यांवर वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले असते तर, आरोपींची भूमिका स्पष्ट करणे अवघड झाले असते. त्यामुळे कट पाकिस्तानात शिजला हे कदाचित सिद्ध झाले नसते. म्हणून न्यायालयाबाहेरचा युक्तिवाद करत आम्ही एकच आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी पुण्यात दिली.

सकाळ साप्ताहिकाच्या ३६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजीनगर येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, सकाळ साप्ताहिकाचे संपादक माधव गोखले उपस्थित होते. तर्कशुद्ध युक्तिवाद हा केवळ न्यायालयातच नाही, तर न्यायालयाबाहेर पोलिसांपुढे देखील करावा लागतो, असे सांगताना अॅड. निकम यांनी हा किस्सा सांगितला.

Ujjwal Nikam
Shambhuraj Desai : ईडीचा गैरवापर कुठे झाला ते जाहीर करा, देसाईंचा सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर!

अॅड. निकम म्हणाले , ‘‘कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांवर एकच आरोपपत्र दाखल करत, खुल्या न्यायालयात हा खटला चालवला गेला. कसाबने मृत्यू झालेल्या नऊ अतिरेक्यांसह हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजल्याचे सिद्ध झाल्यामुळेच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला रेडलिस्टमध्ये टाकले. पुढे डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार बनवत कट पाकिस्तानातच शिजल्याचे भक्कम पुरावे जगासमोर मांडता आले.’’ कसाबचा खटला खुल्या न्यायालयात चालवल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे आपण भारतीय न्यायव्यवस्थेची पारदर्शकता जगासमोर दाखवली, असे मतही ॲड. निकम यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमादरम्यान सकाळचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुजाण आणि विवेकी वाचकांची बौद्धिक व मानसिक भूक भागवायचे काम सकाळ साप्ताहिक करत असल्याचे श्रीराम पवार यांनी सांगितले.

Ujjwal Nikam
Hingoli : शिंदे सरकारच्या निर्णय स्थगितीला राष्ट्रवादीचे आमदार वैतागले, म्हणाले..

ते म्हणाले, ‘‘ज्या काळात नियतकालिक धापा टाकत आहे. त्या काळात सकाळ साप्ताहिक ताठपणे उभे आहे. अनेकांना लिहिते करत लेखक उभे करण्याचे काम साप्ताहिकाने केले आहे. भवतालाचा समाज अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न सामाजिक जाणिवेतून आम्ही करत आहोत.’’ साप्ताहिकाचा मागील ३५ वर्षाच्या समृद्ध लिखाण परंपरेचा सारिपाट गोखले यांनी मांडला. आपली वैशिष्ट्ये जोपासत काळाबरोबर बदलण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com