Bazar Samiti Election : शिवतारे-जगतापांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नीरेत ९५ टक्के मतदान : युतीच्या प्रचारातंत्राने महाआघाडी सावध

महाविकास आघाडीने व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा बिनविरोध पटकावत खाते खोलले आहे.
Neera Bazar Samiti Election
Neera Bazar Samiti ElectionSarkarnam
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : नीरा (neera) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीसाठी आज नऊ केंद्रावर ३१३८ पैकी २९७१ म्हणजेच ९४.६७ टक्के मतदान झाले. सोळा जागांसाठी उभ्या असलेल्या तेहतीस उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले असून उद्या (ता. २९) मतमोजणीनंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. निकालात महाविकास आघाडीची (Mahavikas aghadi) प्रतिष्ठा आणि युतीचे अस्तित्व पणाला लागले आहे. (95 percent turnout for Neera Bazar Samiti)

नीरा बाजार समितीत पुरंदरच्या ९५ सोसायटी व ९० ग्रामपंचायती, तर बारामतीच्या ६१ सोसायट्या व २८ ग्रामपंचायती मतदानासाठी समाविष्ट आहेत. सकाळी आठपासून नऊ केंद्रावर मतदानाला अत्यंत शांततेत सुरवात झाली. बारापर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायत मतदारसंघात १०९२ पैकी १०३५ (९४. ७८ टक्के) मतदारांनी, तर सोसायटी मतदारसंघात १९१७ पैकी १८१६ (९४.७३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Neera Bazar Samiti Election
Bazar Samiti Election : देवदत्त निकम वळसे-पाटलांना धक्का देणार का? मंचर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष

हमाल व तोलारी मतदारसंघात सासवड केंद्रावर ५०, तर नीरा केंद्रावर ७० असे एकूण १२० (९३ टक्के) मतदान झाले. मुर्टी सोसायटीसाठी शंभर, तर ग्रामपंचायतीसाठी नव्व्याण्णव टक्के इतके सर्वाधिक मतदान केले. तुलनेने सासवडला कमी मतदान झाले. आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, भाजप नेते जालिंदर कामठे आदींनी विविध केंद्रांना भेटी दिल्या.

Neera Bazar Samiti Election
Bhor Bazar Samiti Result : सोसायटीत थोपटेंचे उमेदवार आघाडीवर; तर ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीयांची ‘काँटे की टक्कर’!

बाजार समितीत राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष -शेतकरी संघटना यांनी शड्डू ठोकला होता. महाविकास आघाडीने व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा बिनविरोध पटकावत खाते खोलले आहे. यानंतर सुरवातीला सुस्त असलेल्या प्रचारात अखेरच्या दोन-तीन दिवसातच रंगत आली.

Neera Bazar Samiti Election
Bazar Samiti Result : मंगळवेढ्यात आवताडेच 'बॉस' : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर वर्चस्व; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना फक्त दोन मते

युतीच्या प्रचारतंत्रामुळे आघाडीनेही अखेरीस मरगळ झटकून काम केले. त्यामुळे आता उद्याच्या मतमोजणीतच सतत सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीपुढे युतीने कितपत आव्हान दिले आहे हे स्पष्ट होणार आहे. नेहमीच आघाडीचे वर्चस्व असते. पण प्रथमच ग्रामपंचायत व हमाल मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com