Shivsrushti Pune : महापालिकेची शिवसृष्टी कागदावरच; पुरंदरेंच्या शिवसृष्टीला राज्य सरकारचे मोठे गिफ्ट!

Shivsrushti Pune News : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
Purandare, shinde, 
Fadnavis
Purandare, shinde, FadnavisSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) शिवसृष्टीची घोषणा करून दोन वर्षे उलटली. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात काहीच झाले नाही. दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीला राज्य सरकारने (State Govt) तब्बल ५० कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने या संस्थेला केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी अर्थिक मदत आहे. या मदतीमुळे शिवसृष्टीचे बरेच काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टी उभी राहण्यासाठी शिवशाहीर पुरंदरे यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. काही महिन्यांपूर्वी पुरंदरे यांचे निधन झाले. गेल्या काही वर्षापासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना या शिवसृष्टीवरून काही पक्ष-संघटनांनी लक्ष्य केले होते. मात्र, पुरंदरे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी विशेष स्नेह होता.

Purandare, shinde, 
Fadnavis
Gram Panchayat : गोंदियात प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, भाजपचे गोपाल अग्रवालांची प्रतिष्ठा पणाला

पुरंदरे यांचे निधन झाले तरी त्यांनी उभ्या केलेल्या या शिवसृष्टीला राज्य सरकारने भरघोस मदत केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात शिवसृष्टीचे काम अधिक जोमाने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही पक्ष आणि संघटनांनी पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला विरोध केला होता. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला मदत करण्यापेक्षा महापालिकेने पुण्यात स्वतंत्र शिवसृष्टी उभी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाापलिकेने चांदणी चौकात जागा निश्‍चित करून अर्थसंकल्पात तरतूद केली होती. मात्र, प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

Purandare, shinde, 
Fadnavis
Officers Transfer : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार तर पिंपरी-चिंचवडला विनयकुमार चौबे!

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात पुण्यातील शिवसृष्टीला ५० कोटी रूपये देण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. यापूर्वी पुण्यातील कोणत्याही संस्थेला एवढी मोठी अर्थिक मदत मिळालेली नाही. या निधीतून शिवसृष्टीचे रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीसाठी यापूर्वी राज्य सरकारने जागा दिलेली आहे. पुण्यात कात्रज-आंबेगाव दरम्यान ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com