PCMC News : शेकडो कोटींच्या कथित टीडीआर घोटाळ्यात मोठी अपडेट, पिंपरी पालिका तोंडघशी

TDR Scam : शेकडो कोटींच्या टीडीआर वाटपाला स्थगिती,मग,चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार का?
Pimpri- Chinchwad Latest News
Pimpri- Chinchwad Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड महापालिकेत दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला होता.त्यानंतर हे वाटप रद्द करून त्याबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी पुढे आली.

यामुळे हा टीडीआर देऊन मोठ्या अडचणीत आलेले महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी त्याच्या वाटपाला स्थगिती देत असल्याची घोषणा शनिवारी (ता.20) केली. एवढेच नाही, तर तो दिलेले वाकड येथील बांधकामही थांबविण्यााचा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे तेच नाही,तर महापालिका प्रशासनही तोंडघशी पडले आहे.

Pimpri- Chinchwad Latest News
Ajit Pawar : फडणवीसांचे 'ते' आश्वासन दादा पूर्ण करणार ?

या कथित टीडीआर घोटाळ्यात (TDR) कोट्यवधी रुपयांचा मलिदा महापालिका अधिकाऱ्यांना वाटण्यात आल्याचा आरोप झाला आहे. त्याला या स्थगितीने आज बळ मिळाले.दुसरीकडे कोरोना काळात एकाही रुग्णावर उपचार न करता पालिकेकडून सव्वातीन कोटी रुपये उकळणारा कोरोना सेंटरचालक ठेकेदार स्पर्श हॉस्पिटलकडून हे पैसे वसूल करण्याचा आदेश शेखरसिंहांनी (Shekhar Singh) काल काढला होता. मात्र, तो चुकीचा असून त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे या ठेकदाराने शनिवारी (ता.20) पत्रकार परिषद घेऊन सांगितल्याने आयुक्तांची दुहेरी गोची झाली आहे.

वाकड येथील टीडीआर घोटाळ्याची मागील शहर दौऱ्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दखल घेत चौकशीचे संकेत दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजप आमदारांनी,तर याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.दरम्यान, पवार हे आज सकाळी शहर दौऱ्यावर आले. त्यावेळी आय़ुक्त भेटत नसून नागरी प्रश्नांवर बोलत नाहीत,अशी तक्रार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे केली. त्यावर त्यांना सांगतो, ते भेटतील,असे पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर लगेच दुपारी आयुक्त पत्रकारांना भेटले.यावेळी त्यांनी कथित टीडीआर घोटाळ्यातील त्याच्या वाटपाला आणि त्याच्या बांधकामालाही स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.मात्र, त्याची चौकशी होऊन सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मूळ मागणी तशीच आहे. तीच खरी कळीचा मुद्दा असून ती होणार का,याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pimpri- Chinchwad Latest News
Pimpri TDR Scam : चौकशीसाठी सत्ताधाऱ्यासंह विरोधकही एकवटले, पिंपरी आयुक्तांवर संक्रात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com