Abhijit Shivarkar News : कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

Police News : एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Police News
Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : जमिनीला टाकण्यात येत असलेले कुंपण आणि हद्दीच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १० जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अभिजित बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात महिलेची वडिलोपार्जित जागा आहे.

Police News
Marathwada Politics : धनंजय मुंडेंच्या धडाक्याने भाजप गार ! पालकमंत्रीपद नकोरे बाबा

त्या जागेची त्यांनी भूमापन अधिकाऱ्यांकडून सरकारी मोजणी केली होती. मोजणीनंतर त्या ठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्या वेळी शिवरकर यांनी कुंपण घालत असलेल्या कामगारांना रोखले व खांब काढून टाकले.

'आम्ही जमीन मालक आहोत,' असे म्हणत शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांनी महिलेला तेथून हाकलून लावले. 'पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारू, अशी धमकी व त्यांचा विनयभंग केला, असा आरोप करण्यात आला आहे.

खोटे आरोप करून माझ्याविरोधात तक्रार दाखल आली आहे. तक्रारदार महिला कोण आहे हे देखील मला माहिती नाही. चौकशीबाबत मला पोलिसांनी नोटीस दिली. चौकशीस माझे संपूर्ण सहकार्य राहिल. मात्र, तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही प्रकार मी केलेला नसल्याचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Police News
Amit Shah Mumbai Tour : ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी कुणी फोडली ? शिंदेंनी उघड-उघडच सांगून टाकले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com