Amit Shah Mumbai Tour : ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी कुणी फोडली ? शिंदेंनी उघड-उघडच सांगून टाकले !

Eknath Shinde News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. आधी ठाकरेंच्या शिवसेनेत आणि नंतर ज्येष्ठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फूट पडली. या घडामोडींमागे भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती असल्याची चर्चा असते. त्यावर आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवारी शिक्कामोर्तबच केले. अमित शाह यांचे कौतुक करताना त्यांनी राज्यातील राजकीय भूकंपांच्या मागे शाह हेच सूत्रधार असल्याचे सांगून टाकले. शिंदेंच्या या कबुलीने ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि पवारांची राष्ट्रवादी कुणी फोडली हे लोकांना कळून चुकले.

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी आरएसएस प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी शाहांवर स्तुतीसुमने उधळली. शिंदे म्हणाले, अमित शाह यांना एक कणखर नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पण, शाह किती कणखर आहेत याचा अनुभव मला जास्त आहे. जी काही राज्यात वर्षभरात क्रांती झाली त्यात...त्यामुळे म्हणतो मला त्यांचा जास्त अनुभव आहे.

Eknath Shinde News
Marathwada Politics : धनंजय मुंडेंच्या धडाक्याने भाजप गार ! पालकमंत्रीपद नकोरे बाबा

या भाषणावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अमित शाह एकमेकांकडे पाहून हसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. त्यावेळी रात्री-अपरात्री बैठका व्हायच्या. शाह यांनी एकदा शब्द दिला की तो दिलाच. इतिहास वाचायचा नसतो इतिहास घडवायचा असतो असे अमित भाईंचे म्हणणे असते असेही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितले. राज्यात सहकार अडचणीत असताना सहकार विभागाचे मंत्री म्हणून अमित शाह यांनी मदतीचा हात दिला. साखर उद्योगाचा दहा हजार कोटींचा आयकर माफ करून या उद्योगाला नवसंजीवनी मिळवून दिल्याचे यावेळी शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शाह यांनी ३७० कलम हटवले. देशाची त्यांना खडा न् खडा माहिती आहे. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती काय असे हे त्यांनी प्रत्येकवेळी दाखवले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सहकार चळवळ हा महाराष्ट्र आणि गुजरातमधील महत्वाचा दुवा आहे. तळागाळापर्यंत चळवळ रुजविण्याचे काम इनामदार यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या कामाने प्रभावित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही लक्ष्मणरावांना आपला मार्गदर्शक मानत होते.

दरम्यान, अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर असताना उपमुख्यंत्री अजित पवार त्यांच्या दौऱ्यात नव्हते. त्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यातच नार्वेकर यांची दिल्ली वारी आणि शाह यांचा मुंबई दौरा झाला. त्यामुळे आणखी नवीन काय राजकारण शिजते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Edited by : Amol Jaybhaye

Eknath Shinde News
Amit Shah Mumbai Tour : अमित शाह मुंबईत असूनही अजित पवार बारामतीला का निघून गेले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com