नरेंद्र मोदींवर ध्वजसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा- नाना पटोलेंची मागणी

PM Narendra Modi| Nana Patole| या देशाचा पैसा लुटून चीनला देणंं हे देशप्रेम आहे का
PM Narendra Modi| Nana Patole|
PM Narendra Modi| Nana Patole|

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच ध्वजाचा अपमान केला. पंतप्रधानच राष्ट्रीय ध्वजाने स्वत:चा घाम पुसत आहेत. तर त्यांच्यावरच ध्वजसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले (Nana Patole) आज (१४ ऑगस्ट) कॉंग्रेस (Congress) आयोजित स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रेसाठी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मागणी केली आहे.

त्याचवेळी नाना पटोले यांनी त्यांच्या जवळचा एक फोटोही सरकारनामासोबत शेअर केला आहे. या फोटोत नरेंद्र मोदी राष्ट्रध्वजाने त्यांचा घाम पुसताना दिसत आहेत. यावरुन नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान मोदींवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकार तिरंग्याचा मान करायला निघाला आहे की अपमान याचंही उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi| Nana Patole|
Vinayak Mete : सामाजिक जीवनात मेटेंनी मोलाची कामगिरी बजावली : शरद पवार

कॉंग्रेसवर प्रत्येकवेळी त्यांच्या देशभक्तीवरुन आणि तिरंग्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, असे विचारले असता पटोले म्हणाले की, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नव्हता, त्यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याआधी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यावर राग का आहे, या प्रश्नाचंं आधी त्यांनी उत्तर द्यावं.

भाजपनेते तेजस्वी सुर्या म्हणाले ज्यांना आरएसएसचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही इतिहासाचे वर्ग आयोजित करु असा सवाल त्यांना करण्यात आला. आम्हाला आरएसएसच्या वर्गांची गरज नाही. केंद्रात त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंंबेडकर यांचे आर्थिक धोरण बदलून आरएसएस विचारांचा जो जीएसटी कायदा आणला. या देशाचा पैसा लुटून चीनला देणंं हे देशप्रेम आहे का, असाही सवाल पटोले यांनी त्यांना विचारला आहे.

तसेच, नाव सुर्या ठेवल्यामुळे कोणी सुर्यासारखं प्रकाशमान होत नाही. आरएसएसचे कुठले धडे कोणी घेऊ नये, जुने लोकही हेच सांगायचे, आरएसएसचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे. त्यामुळे त्यांच्याकडून देशप्रेम घेण्याचे कुठलही कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देशातील लोकांना खोटा इतिहास सांगून, खोटी स्वप्न दाखवून ते सत्तेत तर गेले पण या आठ-नऊ वर्षातच देशातील जनतेला हे कळलं की कॉंग्रेसचं देशाला प्रमुख भूमिकेत नेऊ शकतो. महासत्ता बनवू शकतो आणि कॉंग्रेसच देशाच्या संवैधानिक व्यवस्थेचे आणि लोकशाहीचे रक्षणही करुन शकते आणि सर्वांना न्याय देऊ शकते हे लोकांना कळले आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com