Pune Covid News: पुण्यात आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन हाय अलर्टवर

Covid News: राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे.
Maharashtra, Covid 19
Maharashtra, Covid 19File Photo
Published on: 
Updated on: 

Corona Virus : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही (India) प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारीचे उपाय सुरु करण्याचे आदेश केंद्र सरकारने कोरोना (Covid 19) नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाच आता पुणेकरांच्या चिंतेतही भर पडली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळावर या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात (Pune) सध्या कोरोनाचे ५४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत

Maharashtra, Covid 19
Ajit Pawar news : अजितदादांनी घेतली गोगावलेंची फिरकी; मंत्रिपदाच्या शपथविधीला हजेरी लावणारच...

राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. मुंबईमध्ये ४९ रुग्ण सक्रिय तर पुण्यात ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यासाठी सातत्याने आव्हान केले जात आहे. (Latest Marathi News)

चीनमध्ये कोरोनाची भयावह परिस्थिती असून आता अमेरिकेमध्येही कोरोनाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. चीनमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख मंदिर प्रशासानांनी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान प्रशासनाकडून दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

यासोबतच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात कर्मचाऱ्यांसाठीही मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातही दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना मास्कसक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातही कर्मचारी आणि भाविकांना मास्क वापरण्याचा सूचना देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com