Shivneri : शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र महामार्गाची लवकरच घोषणा करू; शिष्ठमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

Eknath Shinde : वढु बुद्रुक ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक असा स्वतंत्र मार्ग बनविण्यासाठी आपण विचार करु आणि लवकरच त्याबाबत घोषणा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वढु बुद्रुक ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाला दिली.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने आज (ता.०९) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी वढु बुद्रुकला २१ मार्चला येण्याबाबत लवकरच कळवणार असल्याचेही सांगितले.

Eknath Shinde
Raj Thackeray : गेली दोन वर्ष दहावीत नापास झाल्या सारखं वाटतंय..; राज ठाकरे असं का म्हणाले?

स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखडा ३९७ कोटींचा मंजुर केल्यानंतर त्यांचे जाहीर आभार मानन्यासाठी वढु बुद्रुकच्या शिष्ठमंडळानी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वढु बुद्रुक, वढु खुर्द, कोरेगाव भिमा, परिसरातील सर्व गावांची माहिती घेतली.

तसेच वढु ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी (ता.जुन्नर) ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक (ता.शिरुर) असा स्वतंत्र मार्ग विकसित करण्याची मागणी आणि या मार्गासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

यावर शिंदे यांनी याबाबत आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठोस निर्णय जाहीर करु. असे सांगितले.

Eknath Shinde
PCMC News: ना कुणी वेळेवर येतंय, ना कुणी गणवेश वापरतंय; प्रशासकीय राजवटीत पालिका अधिकारी, कर्मचारी मोकाट

दरम्यान, २१ मार्चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३३४ वी पुण्यतिथी आहे. त्यादिवशी येथे शासकीय मानवंदनाही दिली जाते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यामधून कसा वेळ काढता येईल ते पाहतो व लवकरच येण्यासाठीची माहिती कळवितो, असं मुख्यमंत्र्यांनी शिष्ठमंडळाला सांगितले.

Eknath Shinde
Maharashtra Budget: शिवसृष्टीत साकारणार राजसभा अन् पुरंदरचा तह; अर्थसंकल्पात ५० कोटीची तरतूद

दरम्यान, शिवजन्मभूमी शिवनेरी-जुन्नर-नारायणगाव (तिनही ता.जुन्नर) पारगाव-धामणी-लोणी (तिनही ता.आंबेगाव) व पाबळ-केंदूर-चौफुला-वढु बुद्रुक (ता.शिरुर) असा हा एकसलग सहापदरी रस्ता शंभूभक्त-शिवभक्तांना अपेक्षित आहे.

हा संपूर्ण मार्ग वढु बुद्रुक ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना अगदी नकाशावर दाखवून दिला. याबाबत तात्काळ सर्व्हेक्षण करु, अशीही ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती माजी सरपंच अंकुश शिवले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com