Mahayuti Conflict : अखेर महायुतीतील मोठ्या वादावर तोडगा निघाला : भाजपची शिवसेना, राष्ट्रवादीसोबत डील ठरली

Mahayuti Conflict deal : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांतील वादानंतर महायुतीने पक्षांतर पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत तणाव निवळत आगामी निवडणुकांसाठी एकजूट होण्याची शक्यता आहे.
BJP, Shiv Sena, and NCP leaders announcing a unified Mahayuti decision to stop cross-party entry after disputes surfaced during municipal elections.
BJP, Shiv Sena, and NCP leaders announcing a unified Mahayuti decision to stop cross-party entry after disputes surfaced during municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Conflict Resolution: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याने यापुढे घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री आणि भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

याबाबत लवकरच महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये महायुतीमध्ये निर्माण झालेला विसंवाद आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये दिसू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्षाचे मूळ ठाण्यातील सत्तासंघर्षात असल्यामुळे ठाण्यातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांची लवकरच बैठक होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

BJP, Shiv Sena, and NCP leaders announcing a unified Mahayuti decision to stop cross-party entry after disputes surfaced during municipal elections.
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या हट्टामुळे भाजप एकाकी : शिवसेना, राष्ट्रवादीची 'तपोवन वादात' भूमिका क्लिअर!

मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये मतभेद झाले असून काही पक्षांमध्ये नाराजी आहे. मात्र आमच्यात मनभेद झाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कसलेही मतभेद आणि मनभेदही नाहीत. स्थानिक पातळीवर वाद झाले असले तरी महायुतीला कसलाही धोका नाही. दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये यापुढे महायुतीमधील कोणताही नेता,पदाधिकारी, कार्यकर्ता यांना दुसऱ्या पक्षाने प्रवेश द्यायचा नाही. विरोधकांमधील कोणालाही फोडल्यास, पक्षात प्रवेश देण्यास काही हरकत नाही. मात्र भाजपने (BJP) शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही. अशाच प्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनी भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात येणार असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

BJP, Shiv Sena, and NCP leaders announcing a unified Mahayuti decision to stop cross-party entry after disputes surfaced during municipal elections.
Ajit Pawar-Sharad Pawar Alliance : अजितदादांच्या राष्ट्रवादीला हवी आहे शरद पवारांची साथ! पुण्याच्या राजकारणाची नेमकी गणितं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com