Pimpri-Chinchwad political News : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी (ता.२५) पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या वेळी उद्योगनगरीत रात्री मीडियाशी बोलताना त्यांनी छोटे राजकीय पक्ष संपविण्य़ाची भाषा केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देशातील लोकशाही संपवायची आहे, असा घणाघात केला. तसेच देशात हुकूमशाहीचे वातावरण असल्याचे सांगत मोदी-शाह यांच्यावरही टीका केली.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा आघाडीत ठाकरे शिवसेनेला मिळणार असल्याने तेथे त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे मेळावा घेतला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी बावनकुळेंवर निशाणा घेतला. बावनकुळे यांचा मकाऊ दौरा वादग्रस्त ठरला. कारण त्यात ते कॅसिनोत गेले आणि लाखो रुपये हारले, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर आता बावनकुळेंनी ग्रामीण भागातील लहान राजकीय पक्ष संपवा, अशी भाषा केली. त्यावर बोलताना बावनकुळेंचे चीनशी जवळचे संबंध असल्याने त्यांना तेथील लोकशाही भारतात आणायची आहे. त्यासाठी सध्याची देशातील लोकशाही संपवायची आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांचे चीनशी जवळचे सबंध आहेत, असे सांगत पण, गैरसमज करून घेऊ नका, मकाऊबद्दल मी बोलत नाही, त्यामुळे वेगळा अर्थ काढू नका, असे ते उपरोधाने म्हणाले.
जरांगे प्रकरण स्पष्ट झाल्यावर त्यावर बोलू, असे ठाकरे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षण द्यायचेच होते, तर जालना येथे (अंतरवाली सराटी) पोलिसांनी लाठीमार का केला?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणी त्याचे आदेश दिले?,अशी विचारणा केली.
तसेच भाजप आमदार नितेश राणे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, अशा काही लोकांवर मी बोलत नसल्याचे सांगत त्यांच्यावर बोललो, तर माझी पातळी खाली येईल. असे ते म्हणाले. मावळमध्ये पक्षाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,असे सांगत त्यांनी ही जागा आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) लढणार यावर शिक्कामोर्तब केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.