Swami Govind Dev Giri : 'बटेंगे तो कटेंगे' नंतर 'घटेंगे तो भी कटंगे'चा नारा चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

Swami Govind Dev Giri Maharaj Statement : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटंगे' असा नारा दिला होता. तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. या दोन्ही घोषणा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या.
Yogi Adityanath | Narendra Modi | Swami Govind Devagiri Maharaj | Mohan Bhagwat
Yogi Adityanath | Narendra Modi | Swami Govind Devagiri Maharaj | Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 19 Dec : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटंगे' असा नारा दिला होता. तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. या दोन्ही घोषणा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या.

त्यानंतर आता अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी पुण्यात दिलेली घोषणा चर्चेत आली आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे.

19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान स.प.महाविद्यालय मैदान येथे हा महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गुरूवारी या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी उपस्थिती लावली.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने हिंदुत्वाचा नारा देत हिंदूंना एकसंघ होण्याचं आवाहन केलं होतं. यासाठी सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या ज्या वेळी हिंदू विभागला गेला त्या त्या वेळी त्यांचा पराभव झाल्याचं सांगत, 'बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील हिंदू एक असतील तर सेफ असतील असं सांगितलं.

Yogi Adityanath | Narendra Modi | Swami Govind Devagiri Maharaj | Mohan Bhagwat
Top 10 News : नव्या वर्षात उडणार गावगाड्यांचा बार; संसदेच्या आवारात घमासान; शहांच्या ‘त्या’ विधानाने विरोधक आक्रमक - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

दरमम्यान, निवडणुकीनंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. हिंदूंच्या प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवत म्हणले होते. यासाठी लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला त्यांनी दिला होता. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी झाला तर समाज नष्ट होतो असा इशारा भागवतांनी दिला होता.

Yogi Adityanath | Narendra Modi | Swami Govind Devagiri Maharaj | Mohan Bhagwat
Dr Babasaheb Ambedkar Row : संसदेच्या आवारात घमासान; भाजप खासदार ICU मध्ये; केंद्रीय मंत्री रुग्णालयात पोहचले

भागवत यांच्या या वक्तव्यानंतर आत्ता भागवता यांच्या समोरच गोविंद देव गिरीजी महाराज यांनी नवा नारा दिला आहे. 'बटेंगे तो कटेंगे' ही गोष्ट आपल्याला लक्षात येते मात्र, 'घटेंगे तो भी कटेंगे' ही गोष्ट देखील आपण लक्षात घेणे आवश्यक त्यामुळे हिंदूंच्या जनसंख्येमध्ये वाढ करत राहणे आवश्यक असल्याचं गोविंद देव गिरी महाराजांनी म्हटलं आहे. त्यामुळे 'बटेंगे तो कटेंगे' नंतर 'घटेंगे तो भी कटेंगे' हा नवा नारा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com