Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांचा भाजपला निर्वाणीचा इशारा; ’निष्ठावंत ज्या पक्षात जातील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू’

Solapur Political News : सोलापुरात भाजपमध्ये इनकमिंगमुळे निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी असून वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख अस्वस्थ झाले आहेत; पक्षाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
Subhash Deshmukh
Subhash DeshmukhSarkarnama
Published on
Updated on
  1. भाजपमध्ये वाढत्या ‘इनकमिंग’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख अस्वस्थ झाले आहेत.

  2. स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता निर्णय, मंत्रिपद न मिळणे आणि पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीमुळे देशमुखांची नाराजी वाढली आहे.

  3. निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा स्पष्ट इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपला दिला आहे.

Solapur, 26 December : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजीचा स्फोट होण्याचा दिशेने वाटचाल सुरू असून पक्षात होणाऱ्या इनकमिंंगमुळे निष्ठावंतांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. सोलापुरातील स्थानिक नेत्यांना न विचारता होणाऱ्या घडामोडींमुळे भाजपचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुखही अस्वस्थ आहेत. त्यातूनच आमदार सुभाष देशमुख यांनी निष्ठावंतांसाठी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर सोलापूरमधून (Solapur) निवडून आलेल्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, त्यामुळे दोन्ही देशमुख नाराज होते. त्यातच पालकमंत्र्यांच्या कारभारावरही त्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या कार्यशैलीवर दोन्ही देशमुखांनी मौन बाळगून नाराजी दर्शविली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडींमुळे दोन्ही देशमुख विशेषतः आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवायला सुरुवात केलेली आहे.

तत्पूर्वी माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशालाही सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, तो विरोध डावलून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी माजी आमदार माने यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. तो प्रवेश हा आमदार सुभाष देशमुख यांना धक्का होता. तो धक्का सुभाष देशमुख पचवत असतानाच त्यांचे मतदारसंघातील पंखही छाटले जाऊ लागले आहेत.

प्रभाग २२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा मध्यरात्री भाजपत प्रवेश झाला. या प्रवेशामुळे सुभाष देशमुख यांनी पक्षात आणलेल्या आणि शहराध्यक्ष, तसेच भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवाराची शब्द दिलेल्या कार्यकर्त्याची अडचण झाली. त्यामुळे देशमुख हे या निर्णयावर कमालाचे संतापले आहे. पण, त्यांनी आतापर्यंत संयमाने या परिस्थितीवर भाष्य केले आहे. मात्र, आज त्यांच्या नाराजीचा स्फोट झाला.

Subhash Deshmukh
Mangalvedha Politic's : मंगळवेढ्यात भेटीचे राजकारण; नगराध्यक्षा आवताडे भेटल्या एकनाथ शिंदेंना, तर ‘तीर्थक्षेत्र’चे नेते अजितदादांच्या भेटीला!

माध्यमांशी बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी ‘भाजपसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने तिकिट न दिल्यास ते ज्या पक्षात जातील, त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असे स्पष्ट केले आहे. तसेच विधान आमदार विजयकुमार देशमुख यांनीही केले आहे, त्यामुळे भाजपमधील घडामोडींमुळे दोन्ही देशमुख हे नाराज असल्याचे स्पष्ट आहे.

मला असं वाटतं की, ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी, भारतीय जनता पक्षासाठी काम केलेले आहे. त्या कार्यकर्त्यांची क्षमता असताना, त्याच्या पाठीशी भाजप असताना, नागरिक त्याच्यासोबत असताना जर बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली, तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे की, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणारच, असा इशारा देत आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

Subhash Deshmukh
Solapur NCP SP : दोन दिवसांपूर्वीच निलंबन मागे; पवारांच्या नेत्याचे आपल्याच शहराध्यक्षांविरोधात उपोषण

प्र.1: भाजपमध्ये नाराजीचे मुख्य कारण काय आहे?
उ: बाहेरून येणाऱ्यांना संधी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी आहे.

प्र.2: कोणते आमदार या घडामोडींमुळे अस्वस्थ आहेत?
उ: आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख नाराज आहेत.

प्र.3: सुभाष देशमुख यांनी भाजपला कोणता इशारा दिला आहे?
उ: निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा इशारा दिला आहे.

प्र.4: सोलापुरातील भाजपसाठी ही स्थिती का गंभीर मानली जात आहे?
उ: वरिष्ठ आमदारांची उघड नाराजी पक्षातील अंतर्गत फुटीची शक्यता वाढवत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com