Daund News : दौंडच्या शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखासह वीस जणांवर सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल

संशयित आरोपी फरारी आहेत व त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Daund News
Daund NewsSarkarnama

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरात सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखासह एकूण २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (After six months, a case was filed against Shiv Sena city chief of Daund and 20 people)

दौंड (Daund) शहरातील कुंभार गल्लीत २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात दौंडचा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) माजी गटनेता बादशहा शेख याच्यासह एकूण वीस जणांविरूध्द २१ दिवसांच्या विलंबानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला होता. फरार बादशहा शेख याला अजमेर (राजस्थान) येथून २९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.

Daund News
Karnataka Next CM : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट : ‘लोकसभेला आमची मते हवी असतील, तर मुख्यमंत्री...’

बादशहा शेख याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर देखील २० ऑक्टोबर रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दौंड पोलिस ठाण्यावर शेख समर्थक महिलांनी मोर्चा काढला होता.

Daund News
Karnataka Next CM : डीके शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात हे आहेत प्रमुख तीन अडथळे!

दरम्यान, या प्रकरणी शहरातील एका महिलेने तिच्यासह तिचे पती आणि कुटुंबीयांवर देखील सशस्त्र हल्ला झाल्याचा दावा करीत त्या बाबत दौंड पोलिस व पोलिस उप अधीक्षक फिर्यादीची दखल घेत नसल्याचा दावा करीत न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाच्या आदेशाने शिवसेनेचा शहरप्रमुख श्रीनाथ ननवरे याच्यासह अक्षय गोरख घोलप, कुणाल गोरख घोलप, बाबू विजय जमदाडे, अजय घोणे, महेश घोणे, गोरख मच्छिंद्र घोलप, सागर माढेकर, दिपक कांबळे, कोमल जमदाडे (सर्व रा. दौंड) व इतर दहा अनोळखी लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Daund News
Karnataka Next CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री? : शुभेच्छा देत शिवकुमार म्हणाले ‘मी बंडखोर नाही अन्‌ ब्लॅकमेलही करत नाही’

अक्षय घोलप याने २० ऑक्टोबर २०२२ रोजी विनयभंग करून अन्य संशयित आरोपींनी फिर्यादी महिला, तिचा पती आणि कुटुंबीयांना तलवार, लोखंडी सळई, आदींनी मारहाण करून जखमी केले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना मंगळवारी (ता. १६) या बाबत विचारले असता त्यांनी संशयित आरोपी फरारी आहेत व त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com