Sharad Pawar news : सुषमा अंधारेंच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची वारकऱ्यांशी चर्चा

सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायातील संतांबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर वारकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वारकरी आक्रमक झाले आहे. अशात आज (२६ डिसेंबर) पुण्यात ज्येष्ठ वारकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणात वारकऱ्यांचा गैरवापर होत असल्यानेच शरद पवार यांनी तातडीने वारकऱ्यांची बैठक बोलवत त्यांची भूमिका जाणून घेतली.

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याने नाराज असलेल्या वारकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं. त्यावर पवार यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शनही केलं. याच वेळी त्यांनी वारकऱ्यांना संयम राखण्यााचा सल्लाही दिला. तसेच, वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा, असा सल्लाही शरद पवार यांनी वारकऱ्यांना दिला. जवळपास तासभर ही चर्चा सुरु होती. या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेदेखील उपस्थित होते.

Sharad Pawar
Uddhav Thackeray : 'तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील'

काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी वारकरी संप्रदायातील आणि संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज यांच्याबाबत हेतुपुरस्पर टीकात्मक विडंबन केले होते. इतकेच नव्हे त्यांनी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरही टीका केली होती. यामुळे अंधारे यांना वारकरी संप्रदायाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहेत. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. पण तरीही वारकऱ्याचा रोष कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com