Bhagat Singh Koshyari : राजभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा ;"कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.."

Bhagat Singh Koshyari : पंतप्रधान मोदी हे कोश्यारींच्या विधानावर मूग गिळून गप्प आहेत, याचाही आम्ही धिक्कार करतो,"
Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Bhagat Singh koshyari, Governor maharashtraSarkarnama
Published on
Updated on

Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज (शुक्रवारी) काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. कोश्यारी आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. राजभवनासमोर राज्यपालांच्या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Bhagat Singh Koshyari latest news)

"कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार ,स्वप्नील नाईक, राजाभाऊ ठोंबरे, अजित ढोकळे, वाहिद निलगर, उमेश पवार, रोहन सुरवसे, सुजित गोसावी, आशुतोष जाधव आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

"भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राहण्याचा अधिकार नाही. जिथे जिथे राज्यपाल जातील तिथे तिथे काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवप्रेमी जनता त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करेल. देशाचे पंतप्रधान कोश्यारींच्या विधानावर मूग गिळून गप्प आहेत, याचाही आम्ही धिक्कार करतो," असे हनुमंत पवार म्हणाले.

Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

स्वराज्य संघटनेच्यावतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आले होते. स्वराज्य संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Gopichand Padalkar : भुजबळांना काहीच काम नसल्याने ते अशी विधानं करतात ; पडळकरांची टीका

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्यातच अडवून त्यांच्या ताब्यातील काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com