Porsche Car Accident : आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल घेताना 'त्या' डॉक्टरांची शक्कल; पुरावेच नष्ट करण्याचा 'मास्टर प्लॅन' उघड

Pune Porsche Car Accident Minor Accused Blood Sample : डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sasson Doctors who changed Blood Sample
Sasson Doctors who changed Blood SampleSarkarnama

Pune Crime News : कल्याणीनगर अपघातप्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेताना आरोपी डॉक्टरांसह शिपायाने मोठी हुशारी दाखवली होती. तसेच याबाबतचे पुरावे भविष्यात कुणाच्याही हाती लागू नये यासाठी आरोपींनी शक्कल लढवल्याचे तपासात पुढे आले आहे.

ब्लड सॅम्पल घेण्यासाठी अल्पवयीन आरोपीला ससून रुग्णालय दाखल केले. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आल्याची खळबळजनक माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामाही करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात सांगितले.

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची नमुने घेताना तेथील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई घटकांबळे यांच्यासह काही साक्षीदारांचा वावर आहे. तसेच डॉ. तावरे Ajay Taware, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा सीडीआरही जप्त करण्यात असल्याचेही पुणे पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली आहे.

Sasson Doctors who changed Blood Sample
Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचा धंगेकर -अंधारेंना 3 दिवसांचा अल्टिमेटम,म्हणाले, 'माफी मागा, अन्यथा...'

कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ

अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यात अधिकची कलम लावली असल्याचे स्पष्ट झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रक्ताचे नमुने अज्ञाताच्या ताब्यात

रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले असे प्राथमिक तपासात पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र डॉ. हाळनोर याने ते नमुने कचराकुंडीत फेकून न देता कुणातरी अज्ञाताच्या ताब्यात दिल्याचे पुढे येत आहे. आता तो कोण आहे, याचा पोलिस तपास करत असल्याचे सरकारी विकल्यांनी सांगितले. Pune Hit And Run Case

Sasson Doctors who changed Blood Sample
Mahesh Gaikwad News : महेश गायकवाड अ‍ॅक्टिव्ह! पावसाळ्यापूर्वीच 'केडीएमसी'च्या अधिकाऱ्यांवर बरसले; काय आहे कारण?

रक्त घेतलेली महिला कोण?

आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलून त्याऐवजी कोणातरी महिलेचे नमुने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ही महिला कोण आहे, याचा अद्याप तपास लागलेला नाही. याबाबत अधिकचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com