Ajit Pawar News : दादा म्हणतात बारामतीकरांनो कुंकू एकाचं लावा, फार लोकांचे कुंकू लावत बसू नका !

Baramati Lok Sabha Constituency : ज्येष्ठ नेत्यांसह 80 टक्के आमदार हे आमच्या सोबत राहिले. या भूमिकेमागे फक्त नागरिकांचे प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा होती...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Baramati News : आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकामेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची बनली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत, तर महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित केली आहे.

पवार कुटुंबीयातील या नणंद-भावजय यांच्या लढाईत बारामतीकरांची मात्र कोंडी झालेली आहे. नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहायचं, याबाबत अध्यापही बारामतीकर संभ्रमावस्थेत आहेत. ही संभ्रम अवस्था अजित पवार यांनी हेरली असून, त्यांनी बारामतीकरांना आवाहन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना अजितदादा म्हणाले, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील आम्ही काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. ही भूमिका घेताना हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसह 80 टक्के आमदार हे आमच्या सोबत राहिले. या भूमिकेमागे फक्त नागरिकांचे प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Baramati Lok Sabha Constituency : बारामतीत ट्विस्ट पे ट्विस्ट ! अजितदादांनंतर सुनंदा पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

गेले काही वर्षांमध्ये बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारचा निधी आला नाही. जो काही निधी आला तो राज्य सरकारच्या माध्यमातून आला. या निधीच्या माध्यमातून जिरायती भागाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या प्रमाणात हा प्रश्न सुटणे आवश्यक होतं तेवढ्या प्रमाणात हा प्रश्न सुटलेला नाही. ही केंद्राच्या निधीची आवश्यकता असल्याचं अजित पवार म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ही निवडणूक भावनिक नाही. या ठिकाणी उपस्थित राहिलेले लोक मी आलोय म्हणून माझ्या सभेला आलेत. मी ज्याच्या विरोधात निवडणूक लढत आहे ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याही सभेला हे लोक जातात. दोन दगडावरती कशाला पाय ठेवता, असं म्हणत आपल्याकडे एकाचं कुंकू लावायची प्रथा असल्याचं सांगत फार लोकांचं कुंकू लावत बसून नका, असं आवाहन बारामतीकरांना अजितदादांनी केलं.

Ajit Pawar
MP Amol Kolhe News : चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवते का ? खासदार कोल्हे यांनी कोणावर साधला निशाणा !

काही लोक तुम्हाला ओळखत नव्हती, ती आज भिंगरी लावल्यासारखी वाड्या-वस्त्यांवर फिरत आहे. मी चहाला येतो ,नाष्ट्याला येतो, जेवणाला येतो, असं सांगत आहेत. मात्र, या आधी त्यांना चहा ,नाश्ता, जेवण कधी सुचलं नाही. त्यांना मतदारसंघातील पुरेसा भागदेखील माहिती नाही आणि समस्यांची जाणीवदेखील नाही. अजून काही लोक प्रचारासाठी येतील तुम्हाला त्याबाबत आश्चर्य वाटेल. मात्र, तुम्ही तुमच्या भविष्यातील पिढींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा, असं अजित पवार यांनी सांगत अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com