Shirur Political News : शिरूर लोकसभेतील आघाडी आणि महायुतीचे उमेदवार एकमेकांवर दररोज सडकून टीका करीत आहेत. आघाडीचे कोल्हे, तर त्यांच्या पराभवाचा विडा उचललेले थेट अजित पवारांवरच Ajit Pawar निशाणा साधत आहेत. त्यामुळे अजित पवारही कोल्हे यांच्यावर प्रतिहल्ला करीत आहेत. शनिवारी (ता. 27) त्यांनी तो पुन्हा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे केला.
आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोना आला. या संकटातच "ते" राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी शिरूर लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe यांच्याबाबत केला.
तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका, असे मी त्यांना मी विचारलेही होते, असे ते म्हणाले. महायुतीचे शिरूर Shirur लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख, बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही निवडणुक देशाची असून गावकी भावकीची नाही. तिचा निकाल आपले भविष्य ठरवतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम या निवडणुकीतून करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकदीचा नेता आपल्या शिरूरमधून संसदेत पाठवायचा आहे. आढळराव Shivajirao Adhalrao हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे, असे आवाहन अजितदादांनी या वेळी केले.
या वेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, संजय औसरमल, अतिश बारणे, गंगा धेंडे, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, दीपक साकोरे, अपूर्व आढळराव पाटील, सारिका पवार, मनीषा गटकळ आदी उपस्थित होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.