Baramati News : बारामतीमध्ये मी केलेल्या विकास कामांची तुम्हाला जर मला पावती द्यायची असेल, तर अजित पवार हेच लोकसभेचे उमेदवार आहेत, असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि लोकसभा निवडणुकीत निवडून द्यावे, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून लोकसभेचे रणशिंग फुंकले. (Ajit Pawar blew the trumpet of Lok Sabha elections in Baramati)
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी बारामतीतून आपण उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, वरिष्ठांच्या (शरद पवार) विचारांना मान देऊन आपण गेली अनेक वर्षे त्यांच्या विचारांचा उमेदवार आपण निवडून देत आहोत. मात्र, आगामी काळात अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे, असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे. (Baramati Loksabha)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगून त्यातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेला भावनिक आवाहन केले जाईल. पण, मतदारांनी भावनिक न होता विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा. विकासाचे प्रकल्प बारामतीत कोण आणू शकेल, याचाही विचार व्हावा, असे आवाहन करत अजित पवारांनी पुन्हा शरद पवार यांना टोमणा लगावला. शेवटची निवडणूक आहे, असे म्हणतात. पण त्यांची शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आपण लवकरच जाहीर करणार आहोत. त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. नुसतेच इकडे-तिकडे फिरणारे खासदार नको आहेत. विकास कामे करणारा खासदार आपल्याला पाहिजे, असे सांगून अजित पवार यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली.
मोदी-शहांशी निकटचे संबंध
माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी मोदी आणि शहा यांच्याकडे आग्रह करेन. त्यामुळे अजित पवार हाच निवडणुकीला उभा आहे, असे समजून मी उभा केलेल्या उमेदवाराला मतदान करावे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या उमेदवार
बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असू शकतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत सुरू आहे. अजित पवार यांनी अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील, अशी चर्चा अजित पवार यांच्या आजच्या विधानानंतर सुरू झाली आहे.
Edited By Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.