Ajit Pawar Welcome News : अजित पवारांनी अनुभवले बारामतीकरांचे प्रेम, दिलखुलास दिली दाद..

NCP News: उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेल्या अजित पवारांचे न भुतो न भविष्यती असे स्वागत झाले.
Ajit Pawar Welcome Baramati
Ajit Pawar Welcome BaramatiSarkarnama

Pune Political News : उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेल्या अजित पवारांचे न भुतो न भविष्यती असे स्वागत झाले. ढोल-ताशांचा दणदणाट, महिला, भगिनींकडून औक्षण, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि हजारोंच्या गर्दीतून `एकच वादा अजित दादा`, च्या घोषणांनी बारामती आज दणाणून गेली होती.

या सत्काराने अजित पवार भारावून गेले होते, अशा स्वागताची अपेक्षा आपण स्वप्नात देखील केली नव्हती, अशा शब्दात अजित पवारांनी बारामतीकरांच्या प्रेमाचा स्वीकार केला. अजित पवारांना हार घालण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी होणारी रेटारेटी याचा उल्लेख सभेतून करतांना अजित पवारांनी खास आपल्या स्टाईलमध्ये मजेशीर उत्तर दिले.

Ajit Pawar Welcome Baramati
CM Eknath Shinde News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

बायकोने घेतले नसतील एवढे किस आज कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगताच उपस्थितांनी अजिदादांच्या या मिश्किल टिप्पणीला टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. एवढी रेटारेटी, गर्दी आयुष्यात कधी पाहिली नव्हती.

गर्दीत घुसून हात धरणाऱ्या, किस घेणाऱ्यांचेही अजितदादांनी दिलखुलास कौतुक केले. बारामतीत दाखल होतांना गावागावांत झालेल्या स्वागताचा उल्लेख करतांनाच पावसाअभावी सुकलेली पिकं, पाणी नसलेल्या धरणाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com