भाजपच्या रंजन तावरेंनी थोपटले अजित पवारांविरोधात दंड!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून माळेगाव नगरपंचायत निर्माण केली : रंजन तावरे
Ajit Pawar-Ranjan Taware
Ajit Pawar-Ranjan TawareSarkarnama
Published on
Updated on

माळेगाव (जि. पुणे) : बारामती तालुक्यात माळेगाव ग्रामपंचायतचे माळवते सरपंच हे भाजपचे होते, तशीच राजकिय स्थिती यापुढेही राहू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेचा गैरवापर करून माळेगाव नगरपंचायत निर्माण केली. ते करताना सरकारी पातळीवर नियमांची पायमल्ली झाली आहे. त्यामुळेच आम्ही न्यायालयात प्रशासनाविरुद्ध दाद मागितली आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते रंजन तावरे (Ranjan Taware) यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत तावरे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटल्याचे स्पष्ट होते. (Ajit Pawar created Malegaon Nagar Panchayat by abusing his power : Ranjan Taware)

बारामती तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या पंचावर्षिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये १७ प्रभागनिहाय रचना, मतदार यादी प्रसिद्धी आणि अरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्णत्वाला आणण्याचे काम प्रशानाकडून करण्यात येत आहे. नेमके त्याच प्रक्रियेवर आक्षेप घेत रंजन तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

Ajit Pawar-Ranjan Taware
रंजन तावरे यांना हे पटतं का? : राष्ट्रवादीचा खडा सवाल

तावरे म्हणाले की, बारामतीच्या राजकारणात माळेगावने पवार कुटुंबीयावर खूप प्रेम केले आहे. त्यांच्या हितासाठी खरेतर ग्रामपंचायतीचे प्रशासन ठेवणे योग्य होते. सत्तेचा गैरवापर करून विनाकारण घाईगडबडीत नगरपंचायत निर्माण करण्याचा घाट कोणाच्या हितासाठी घातला जातो, हे सुज्ञ जनता जाणून आहे. नगपंचायत म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या खिला कात्री लागणार आहे. त्यामुळे पवारांच्या या धोरणाला आमचा कडाडून विरोध राहणार आहे. त्यासाठी आम्ही यापुढील निवडणूकीत पक्षविरहित आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देणार आहे.``

Ajit Pawar-Ranjan Taware
अजितदादा त्यावेळी मला म्हणाले होते, ‘हरभजनदेखील मॅच जिंकून देतो!’

माजी सरपंचांच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत तावरे म्हणाले, येत्या ता. २९ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीबाबत कोणतेच कामकाज करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश सरकारला आहेत. असे असतानाही प्रशासनाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. विशेषतः ही प्रक्रियाही चुकीच्या पद्धतीने राबविली आहे. जाणीवपूर्वक व राजकीय हेतूने अनेक त्रूटी या प्रक्रियेत प्रशासनाने ठेवल्या आहेत. सरकारचे हे कृत आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे.

Ajit Pawar-Ranjan Taware
पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

सीईओंची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

माळेगाव नगरपंचायतीच्या सीईओ स्मिता काळे यांनी चुकीच्या पद्धीतने प्रभाग रचना व इतर गोष्टी केल्या आहेत. त्यांचे गावाच्या आरोग्याकडे लक्ष नाही, त्यामुळे गावात अनेक लोक तापाने फणफणले आहेत. त्यासंबंधी आम्ही प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असेही रंजन तावरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com