Murlidhar Mohol : डॅमेज कंट्रोलसाठी मुरलीधर मोहोळांची धडपड; CM फडणवीसांच्या भेटीनंतर जैन मुनींपुढे नतमस्तक

Jain Boarding Pune Controversy : मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Murlidhar Mohol
Union Minister Murlidhar Mohol bows before Jain Muni Acharya Gurudev Guptinandiji Maharaj at Pune’s Jain Boarding amid land dispute controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 Oct : पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगची जागा बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणावरून पुण्यात महायुतीत धुसफूस देखील सुरू झाल्यानंतर या प्रकरणी मोहोळ यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान, एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असातनाच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट जैन बोर्डिंगमध्ये जात जैन मुनी आचार्य गुरुदेव गुप्तीनंदीजी महाराज यांची भेट घेत त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.

यावेळी जैन मुनींनी मंत्री मोहोळ यांचे स्वागत केले. मात्र, 'जैन बोर्डिंगमधील वसतीगृह, मंदिर आहे. या जागेचे खरेदी खत खोटे असल्यामुळे ते रद्द झाले पाहिजे. ही जागा वाचवायला हवी, त्यासाठी मी जीव देण्यासाठीही तयार आहे, असं सांगितलं.

Murlidhar Mohol
BJP Politics : 'जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटू, भाजपमधील इन्कमिंगवर गडकरींची नाराजी'; बावनकुळे म्हणाले, आम्हाला...

जैन मुनींच्या या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री मोहोळ यांनी जैन बांधवांना हवा तसा न्याय होईल असं आश्वासन दिलं. ते म्हणाले, 'जैन बोर्डिंगचा विषय सोईच्या राजकारणासाठी दुसऱ्याकडे वळविण्यात आल्यामुळे तो जास्त दिवस चालणे चांगले नाही. या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून तुम्हाला अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो आहे.

जैन बांधवांसाठी न्याय होईल आणि त्यांना हवा तसा निर्णय होईल यात माझी भूमिका महत्त्वाची राहील, असं मी आश्‍वासन देतो.' शिवाय तुम्हाला तुमच्या हक्कासाठी भांडावे लागणार नाही. या प्रकरणात माझेच नाव घेतल्यामुळे मला ही भूमिका मांडण्यास उशीर झाला.

Murlidhar Mohol
BJP On Dhangekar: ...अखेर भाजपनं डोईजड झालेल्या धंगेकरांविरोधात पाऊल उचललंच, अडचणीत आणणारा 'तो' जुना घोटाळा बाहेर काढला

मात्र, मी तुमच्या लोकांशी संपर्कात होतो. आता हा विषय अधिक न वाढता गुरुदेव जे सांगतील त्या पद्धतीने निर्णय होईल, असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मोहोळ जैन मुनींची भेट घेऊन मंदिरातून बाहेर येताच काही जैन बांधवांनी खरेदी खत रद्द करा, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मोहोळ यांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला.

तर यावेळी घोषणा देणाऱ्या नागरिकांना तुम्हाला हवा तसा निर्णय एक नोव्हेंबरपूर्वी निर्णय होईल आणि हा विषय संपेल, असं मोहोळ म्हणाले. त्यामुळे आता येत्या पाच दिवसांमध्ये मोहोळ या प्रकरणात नेमकं काय करणार आणि धंगेकरांनी केलेल्या आरोप ते कसे खोडून काढार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com