Supriya Sule: सुनेत्रा पवारांचा शपथविधी सुरु असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट! काय झाली चर्चा?

Supriya Sule: सुनेत्रा अजित पवार यांचा शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लोकभवन इथं उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला.
Supriya Sule
Supriya Sule
Published on: 
Updated on: 

Supriya Sule: सुनेत्रा अजित पवार यांचा शनिवारी संध्याकाळी ५ वाजता लोकभवन इथं उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. पण त्याचवेळी सुप्रिया सुळे या काटेवाडीत अजित पवार यांच्या आईच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. याठिकाणी त्यांच्यात चर्चाही झाली, याचवेळी अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारही या ठिकाणी भेटीसाठी आले होते. त्यामुळं एकीकडं मुंबईत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची लगबग सुरु असताना दुसरीकडं पवार कुटुंबिय काटेवाडीत एकमेकांच्या भेटी घेत होतं. या भेटीबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली तसंच सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबतही भाष्य केलं.

Supriya Sule
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा शपथविधी, खाते वाटप अन् आता सरकारी बंगलाही दिला; तासाभरातच फडणवीसांनी सगळ्या गोष्टी मार्गी लावल्या

शनिवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर तिथून त्या रवाना झाल्या, यावेळी त्यांची कार माध्यमांच्या प्रतिनिधींनी थांबवून त्यांना भेटीबाबत माहिती विचारली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझी आता फ्लाईट आहे. उद्या देशाचं बजेट आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेते असल्यानं मला तिथं हजर राहणं गरजेचं आहे. त्यामुळं दिल्लीला जाण्यापूर्वी मी आशा काकींना भेटायला आले होते. त्यांच्याशी मी बोलले आणि आता मी पुण्याला जाणार आहे गाडीनं त्यानंतर तिथून मी दिल्लीला जाणार आहे"

Supriya Sule
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची खातीही ठरली! थोड्याच वेळात होणार घोषणा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

पार्थ पवारही या ठिकाणी आले होते यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, "तो त्याच्या आजी-आजोबांना भेटायला आला होता. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा निर्णय जवळपास झाला आहे, असंही पत्रकारांनी विचारल्यानंतर "मला यातलं काहीही माहिती नाही," असं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराना हात जोडत विषय टाळला आणि त्या आपल्या कारमधून पुढे निघून गेल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.