NCP Politics : भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराला फटका?

NCP Politics Assembly Election 2024 Rahul Kul Ajit Pawar : महायुतीच्या जागावाटपामध्ये विद्यमान आमदार असलेली जागा त्याच पक्षाला देण्याचे सुत्र ठरल्याची सांगितले जात आहे.
Devendra Fadnavis Ajit Pawar
Devendra Fadnavis Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार राहुल कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीमध्ये आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना पत्र लिहून केली आहे.

महायुतीच्या जागावाटपामध्ये विद्यमान आमदार असलेली जागा त्याच पक्षाला देण्याचे सुत्र ठरल्याची सांगितले जात आहे. असे असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर अद्यापही महायुतीमध्ये अंतर्गत दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. मात्र ही जागा हर्षवर्धन पाटलांसाठी महायुतीच्या वाटाघाटीमध्ये आपल्याकडे घ्या, अशीच मागणी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची मागणी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात देखील करण्यात आली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात असुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. मात्र माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून हा मतदारसंघ भाजपाला सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तशी गळ त्यांनी वरिष्ठांना देखील घातली आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar
VIDEO : Ramdas Athawale - 'या' दोघांचे का होतात राडे?, याचे मला पडले आहे कोडे ; आठवलेंनी काढला चिमटा!

अजित पवार गटातील आमदार असलेल्या मतदारसंघावर भाजपचे नेते दावा करत असतानाच आता भाजपचे आमदार असलेले राहुल कुल यांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पत्राद्वारे केली आहे. वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

वीरधवल जगदाळे म्हणाले, दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. विकास कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस दौंड मधील घराघरात पोहोचली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांची वीजबील माफी, लाडकी बहीण योजना या योजना आणल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यास उमेदवाराला विजय सुकर होणार आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar
Video Ramraje Naik Nimbalkar : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचा हाती तुतारी घेण्याचा इशारा, अजितदादांना मोठा धक्का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com