Video Ramraje Naik Nimbalkar : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचा हाती तुतारी घेण्याचा इशारा, अजितदादांना मोठा धक्का?

Ramraje Naik Nimbalkar Ajit Pawar Sharad pawar : आपली तक्रार गलोगल्ली दहशत निर्माण करणाऱ्या रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांना साथ देणाऱ्याच्या विरोधात आहे, असे रामराजे निंबाळकर म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ramraje Naik Nimbalkar News : कागलमध्ये भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर अजित पवार गटातील मोठे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील हाती तुतारी घेण्याचा इशारा दिला आहे. रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा दखल न घेतल्यास हाती तुतारी घ्यायला किती वेळ लागतो, असे रामराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

आपली फक्त तक्रार रणजितसिंह निंबाळकर त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतात. त्यांच्या विरोधात आहेत. या दहशतीला भारतीय जनता पक्षाने सत्तेतून साथ देऊ नका. नाही तर आपल्याला हाती तुतारी घ्यायला किती वेळ लागतो, असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले होते.

Ajit Pawar
Balasaheb Thorat On BJP : आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत? बाळासाहेबांचा सवाल, 'संरक्षण देणारे कोण?'

रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत देखील रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. रणजितसिंहाना उमेदवारी दिल्यास आपण त्यांचे काम करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आपल्या समर्थकांचा मेळावा बोलवत रामराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा मोठा पराभव केला होता.

...तर शरद पवार गटाची ताकद वाढणार

रामराजे नाईक निंबाळकर भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर, जय गोरे यांच्यावर नाराज आहेत. निंबाळकर यांना माननारा मोठा वर्ग फलटण आणि सातारा परिसरात आहे. निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेतली तर विधानसभेला फलटणसह सातारमध्ये देखील शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.

Ajit Pawar
Congress News : धक्कादायक! काँग्रेस नेत्यानं पत्नी अन् मुलासह विष पिऊन केली आत्महत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com