Ajit Pawar Group : आम्ही एकत्र काम करतोय, याचा खेद वाटतो; आमदाराने महायुतीचं पितळ केलं उघडं

Ncp Ajit Pawar Group Mla Dilip Mohite Patil on Mahayuti : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदाराने एका सभेत महायुतीचं सत्य उघड केलं...
Dilip Mohite
Dilip Mohitesarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Froup Pimpri Chinchwad News :

राज्याच्या सत्तेतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आता खेडचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) बेधडक आणि आक्रमक आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी राजगुरुनगर (ता.खेड) येथे जाहीर कार्यक्रमात मोठे विधान करून त्याला दुजोरा दिला आणि खळबळ उडवून दिली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र काम करतोय. त्याचा खेद वाटतोय, असे सनसनाटी वक्तव्य त्यांनी केले.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख महेश गायकवाडांवर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच (ता. 2) घडली. तर, त्याअगोदरपासून राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( Ajit Pawar ) छगन भुजबळ हे राज्य सरकारवर मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सडकून टीका करत आहेत. त्यातून महायुतीतच किती टोकाचा संघर्ष आहे, हे स्पष्ट झाले. एवढेच नाही तर त्यांच्यात मतभेदच नाही तर, मनभेदही असल्याला दुजोरा आमदार मोहितेंच्या विधानाने मिळाला.

Dilip Mohite
Ajit Pawar Baramati Visit : अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; ‘...तर आमदारकीबाबत मी वेगळा निर्णय घेईन’

शिवसेना ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांवर आमदार मोहिते यावेळी तुटून पडले. संजय राऊतांपासून ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी सोडले नाही. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी समजूनच घेतले नाही. राजकारणातला अनुभव नसलेला अ.ब.क.ड माहित नसलेला माणूस राज्याचा प्रमुख झाला की काय अडचणी येतात? हे मी अनुभवलंय अशा शब्दांत मोहितेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

आपण पाठवलेल्या आणि राजगुरुनगरमधील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला खोडा घातलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांनाही त्यांनी चॅलेंज दिले. येथे येऊन जो तुम्ही उद्योग केलात, चांगल्या कामाला (प्रशासकीय इमारत) खीळ घालण्याचे काम केलंत, त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावे लागेल. तसेच खेडचा आमदार शिवसेनेचा ( ठाकरे गट ) होईल, हा संजय राऊत यांचा दावा खोडून काढत त्यांना आव्हान दिले. या कामाला खोडा घालणारे शिवसेनेचे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचाही त्यांनी नाव न घेता खरपूस समाचार घेतला. पुन्हा खासदारकीचे त्यांना डोहाळे लागले आहेत. पण ते आमच्याशिवाय पूर्ण होणार नाहीत, असे सांगण्यासही Dilip Mohite Patil विसरले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युती सरकारमधील तीन पक्षांची अवस्था ही पूर्वी मुंबईत एका छोट्या खोलीत चार-चार पेटारे (बिऱ्हाडं) असायचे. त्यातून ज्यानं, त्यानं आपापलं सामान काढायचं, स्वयंपाक करायचा, पुन्हा भांडीकुंडी त्यात ठेवायची, कुलूप लावून कामाला जायचं. तसंच झालंय, आता आमचं. आमचंही तीन पेटारे आहेत, असे मोहिते म्हणताच मोठा हशा झाला.

खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलोत का? अशी विचारणा करीत ज्याचा त्याचा सवतासुभा आहे, असे ते म्हणाले. आमच्या नेत्यांनी निर्णय (युती सरकारात जाण्याचा) घेतला आणि आम्ही त्यांच्या मागे गेलो,अशी फरफट आमदार दिलीप मोहिते-पाटील सांगितली.

edited by sachin fulpagare

Dilip Mohite
Baramati Loksabha : शेवटची निवडणूक म्हणतील...भावनिक करतील; पण मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या; अजित पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com