Ajit Pawar Pune Guardian Minister : चंद्रकांत पाटील यांना डच्चू ; अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री

Maharashtra Politics : शिंदे सरकारमध्ये कालपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अपेक्षेनुसार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद आले आहे. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण राज्य सरकारमध्ये कालपर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. जे आज पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्रिपद राखले आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार आग्रही होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती, पण आज पालकमंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली का, असाही सवाल उपस्थित होत आहे.

Ajit Pawar
Transfers Of Police Officer : साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची बदली; 'यांच्या'कडे असेल नवी जबाबदारी

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार यांच्यापेक्षा पुण्यावर अजित पवारांचे सर्वाधिक लक्ष होते, पण चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. पण पुण्याचे पालकमंत्री मिळवण्यासाठी ते आग्रही होते. विरोधात असतानाही ते पुण्यात सातत्याने सभा घेत होते. अजित पवार पालकमंत्रिपदी हवेत, यासाठी पुण्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि नेतेही आग्रही होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली होती. या बैठकीला सर्व तहसीलचे अधिकारी व मुळशी, दौंड, पुरंदर तालुक्‍यांतील काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी सहकारी संस्थांपासून ते कात्रज समितीपर्यंत सर्वांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता.

पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रीही नेमण्यात आले आहेत.

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर- चंद्रकांत पाटील

अमरावती- चंद्रकांत पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलडाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

Ajit Pawar
Pankaja Munde News : 19 कोटींचा 'GST' भरणार; पण बँकांचे कर्ज कसे फेडणार? पंकजाताई कसा मार्ग काढणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com