Ajit Pawar: आधी बंगला नंतरच लग्न!अजितदादांनी सांगितला किस्सा

Ajit Pawar’s Katewadi Bungalow Cement Shortage During Construction: घर बांधणीसाठी अथवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी सिमेंट आवश्यक असेल तर त्याचं परमिट देण्याचं काम अजित निंबाळकर यांच्या हातात होतं. त्यावेळेस मी निंबाळकर साहेबांकडे भेटायला गेलो..
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी मध्ये उभारलेल्या आपल्या बंगल्याच्या निर्मितीचा किस्सा आज पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितला. 1980 मध्ये जेव्हा सिमेंटचा मोठ्या प्रमाणात शॉर्टटेज होतं. त्या काळात त्यांनी काटेवाडीमध्ये कशा पद्धतीने घर उभारलं आणि त्यासाठी कोणी कोणी मदत केली याबाबत अजित पवार दिलखुलास सांगितलं.

अजित पवार यांच्या हस्ते सारथी मधील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये मी केली 35 वर्षाहून अधिक काळ काम करत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले अजित निंबाळकर, कोकाटे, दांगट, पासलकर, केशवराज निंबाळकर, गजानन पाटील हे सर्व अधिकारी मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा महत्त्वाच्या पदावर होते.

"मला एक गोष्ट नेहमी आठवते अजित निंबाळकर हे पुण्याचे कलेक्टर होते, तो काळ 1979 -1980 चा होता. मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे पद गेलं त्यादरम्यानचा हा काळ होता. त्यामध्ये सिमेंटचा फार मोठ्या प्रमाणात शॉर्टेज होतं. इतकं शॉर्टेज होतं की काही सांगायचं कामच नाही.घर बांधणीसाठी अथवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी सिमेंट आवश्यक असेल तर त्याचं परमिट देण्याचं काम अजित निंबाळकर यांच्या हातात होतं. त्यावेळेस मी निंबाळकर साहेबांकडे भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की काटेवाडीमध्ये मी घर बांधायला काढले आहे. त्यासाठी सिमेंट आवश्यक असल्याची विनंती मी त्यांच्याकडे केली.

Ajit Pawar 1
Ajit Pawar: ठाकरे बंधूंच्या मोर्चांवर अजितदादाचं मोठं विधान; आजच्या कॅबिनेटमध्ये घेणार निर्णय?

मी ठरवलं होतं की बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू म्हणून घर बांधायचं होतं. त्यावेळी अजित निंबाळकर यांनी मला एक हजार सिमेंटच्या पोत्यांचं परमिट दिले.

त्यावेळी 27 रुपये 85 पैसे एवढी एका सिमेंटच्या पोत्याची किंमत होती. त्यामुळे त्या हजार पोत्यांमध्ये माझं घर बांधून झालं. त्यामुळे जेव्हा केव्हा मी काटेवाडीचे घर पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजित निंबाळकर येतात, असं अजितदादा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com