Kolhapur Gokul Dudh Sangh Election : निवडणुकीला एक वर्ष, गोकुळसाठी आतापासून आप्पा महाडिक मैदानात

Former MLA Mahadevrao Mahadik Kolhapur Gokul Dudh Sangh elections : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी तयारी सुरू केली असून, आमदार विनय कोरे यांची भेट घेतली आहे.
 Mahadevrao Mahadik
Mahadevrao Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Dairy Union Elections : पुढील वर्षात होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आतापासूनच जोडण्या सुरू आहेत. गेली 25 वर्ष गोकुळ दूध संघात सत्तेत असलेल्या महाडिक गटाला काँग्रेसने नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाने सुरुंग लावल्यानंतर पुन्हा एकदा गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे.

यासाठी आत्तापासूनच संपूर्ण महाडिक गट मैदानात उतरलेले दिसत आहेत. अशातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेत बंद खोलीत गोकुळच्या निवडणुकीवर चर्चा केली.

माजी आमदार महादेवराव महाडिक अचानक वारणेत येऊन चक्क वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांची भेट घेतल्याने त्याची चर्चा जोरात सुरू आहे. इतकेच नव्हे तर माजी आमदार महाडिक आमदार विनय कोरे यांना पुष्प गुच्छ देत त्यांचं स्वागत केलं. आप्पाच्या हातातील फुलांचा बुके पाहिल्यानंतर ‘आप्पा बुके कशाला आणायचा, असा कोरेंनी सवाल करताच ‘सावकर... इथून पुढे मला कायम बुके घेऊन यायला लागणार’ असे सन्मानाचे उत्तर मिळताच सावकरही भारावून गेले.

 Mahadevrao Mahadik
Ajit Navle Politics: हिंदीची सक्ती हा तर भाजपचा द्वेषमूलक, विभाजनवादी अजेंडा!

दरम्यान मागील निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी पाटील मुश्रीफ गटाला पाठिंबा देत महाडिक गटाला शह दिला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) एकत्र असल्याने विनय कोरे यांचा निर्णय काय असणार? याकडे लक्ष असणार आहे. विधान परिषद निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांनी माघार घेण्यासाठी विनय कोरे यांनी प्रयत्न केले होते.

 Mahadevrao Mahadik
Shiv Chhatrapati Sports Award : ऊसतोड मजुराचा मुलगा 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा'चा मानकरी; कोण आहे शंकर गदई?

या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक, अशी लढत निश्चित मानली जात होती. मात्र राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढवण्यावचा शब्द पाटील यांच्याकडून घेत आमदार अमल महाडिक यांना माघार घेण्याची विनंती विनय कोरे यांनी केली होती.

मात्र पाटील यांनी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवली. त्यामुळे कोरे हे पाटील यांच्यावर नाराज असल्याची बोलले जाते. त्यामुळे या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरे यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार विनय कोरे यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा आली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com