Ajit Pawar: अजितदादांचं 'मिशन पुणे' अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, महत्त्वाचे मोहरे टिपण्यास सुरुवात,दोन माजी उपमहापौर गळाला

NCP Politics : मागील काही महापालिका निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड बनला आहे. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातूनच निवडून आले होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारणात मोठी हालचाल घडताना दिसत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ, जो गेल्या अनेक निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो, तिथे आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आहेत.

मागील काही महापालिका निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड बनला आहे. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातूनच निवडून आले होते. तब्बल 40 नगरसेवकांपैकी 17 ते 18 नगरसेवक हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकिटावरती निवडून आले होते.

यापूर्वीच्या निवडणुकीत देखील सातत्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येताना पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र असताना याच विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे निवडणूक जिंकले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील एकमेव हडपसर विधानसभा मतदारसंघावर आपल्या वर्चस्व कायम ठेवला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपला हा गड अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेले दोन माजी उपमहापौर अजित पवार आपल्या पक्षात घेणार आहेत.

Ajit Pawar
Kolhapur Politics : सतेज पाटलांना न सोसणारा हादरा; शारंगधर देशमुखांसह शिवसेनेत जाणाऱ्या यादीत अनेक मोठी नावं...

माजी उपमहापौर निलेश मगर आणि बंडू तात्या गायकवाड यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक योगेश ससाणे देखील प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

याच विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप येतात.शहराध्यक्षांच्या मतदारसंघातूनच मोठे मोहोरे अजित पवार यांनी टिपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा शहराध्यक्षांना देखील मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com