Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar NCP : भाजपकडून अजितदादांची पुरती कोंडी? राष्ट्रवादीची फरफट, मित्रपक्षाकडून मिळेना भाव...

Ajit Pawar NCP Crisis : भाजपकडून वाढलेल्या दबावामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची अडचण वाढली आहे. मित्रपक्षांचा पाठिंबा कमी होत असून पक्षात अंतर्गत संघर्ष वाढला आहे.
Published on

Pune News : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे वारंवार निर्देश देत आहेत. तरीही २०२४ च्या पक्षफुटीमुळे निर्माण झालेली कमकुवात स्थिती आणि चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पक्षातील बहुतांश नेते-कार्यकर्ते एकट्याने निवडणूक लढण्याच्या तयारीत दिसत नाहीत. त्यामुळे सध्या वरिष्ठ पदाधिकारी दोन हाना पण आपलं म्हणा अशाच भूमिकेत असल्याचे पहिला मिळत आहे.

त्यामुळे भाजपबरोबर युती किंवा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीशी आघाडी असे पर्याय शोधले जात आहेत. पण दोन्ही मोठ्या पक्षांकडून सध्या तरी कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत, असे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेची निवडणूक साडेतीन वर्षानंतर होणार आहे. महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने प्रभागरचनेवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव राहणार हे निश्चित होते. तसेच चित्र प्रभागरचना पाहता लक्षात येते. प्रभागरचना तयार करताना सत्तेतील पक्ष म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विचारात घेतले जाईल, अशी अपेक्षा त्यांचे नेते व पदाधिकाऱ्यांना होती.

Ajit Pawar
Nagarpalika Election : नागपूरच्या राजकारणात 'एबी फॉर्म'चा खेळ; काँग्रेस नेत्याच्या डावपेचाने 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मात्र, राज्याच्या सत्तेमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपने राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेलाही प्रभाग रचना करताना डावल. यामुळे नाराज झालेल्या अजित पवार यांनी महापालिका स्वबळावर लढण्यासाठी तयारी करा अशा सूचना नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, पक्षातच झालेले दोन तुकडे आणि चार सदस्यीय प्रभाग रचना यामुळे मागील सभागृहातील नगरसेवकांची संख्या कायम ठेवण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर येऊन ठेपल आहे.

राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढल्यास पूर्वीचे संख्याबळ कायम ठेवणेची शक्यता कमी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवकांची संख्या जेवढी होती, तेवढ्याच जागा सोडण्याचा प्रस्ताव भाजपला देण्यात आला होता. मात्र, त्यावर देखील भाजपकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

Ajit Pawar
IAS Transfer : निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी बातमी! राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

हाही विचरेना आणि तोही घेईना

भाजपसोबत युतीचा प्रयत्न फसत असल्याचे लक्षात येताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळून घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र लढल्यास मत विभागणी होणार नाही. मागील निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या कायम ठेवून या संख्येत भर घालता येऊ शकते. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सध्या तरी फरफट सुरू असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com