Ajit Pawar: प्रचार ऐन भरात आला असतानाच अजितदादांची मित्रपक्षानं साथ सोडली! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का

Ajit Pawar NCP Setback RPI breaks alliance: अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आघाडी करण्याचा प्रस्ताव मी त्यांना दिला होता. मात्र मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत, असे सचिन खरात म्हणाले.
Ajit Pawar suffers setback during election campaign
Ajit Pawar suffers setback during election campaignSarkarnama
Published on
Updated on

NCP alliance crisis: सध्या राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र आता या अजित पवारांच्या मिशनला एक मोठा धक्का बसला आहे. निवडणूक प्रचार ऐनभरात आला असतानाच मित्रपक्षाने दादांची साथ सोडली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खरात गटाने आघाडी केली होती. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवत असल्याचे देखील सांगितले गेलं होतं. मात्र आता या पक्षाचे अध्यक्ष असलेले सचिन खरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केलं आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यावरून प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी अजित पवार यांनी आमची खरात गटाशी आघाडी झाली असून त्यांच्या माध्यमातून हे उमेदवार दिले असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं.

यानंतर आता खरात समोर आले असून त्यांनी आपण आघाडी तोडली असल्याचे सांगितले आहे. सचिन खरात म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आघाडी करण्याचा प्रस्ताव मी त्यांना दिला होता. मात्र मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाही.

त्यामुळे सर्व महापालिका निवडणुकीत मधून मी बाहेर पडत आहे. माझ्या पक्षाचा कोणत्याही पक्षाला अथवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा राहणार नाही. राजकारणामध्ये दोन पावलं मागे आलो तर चालेल, मात्र मी कोणताही चुकीचं पाऊल उचलणार नाही असं खरात यांनी स्पष्ट केलं.

खरात यांनी काय प्रस्ताव दिला होता

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या समता व बंधूत्वाच्या विचारधारेवर आमचा पक्ष संपूर्ण राज्यात समाजसेवेचे कार्य करत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा असणा-या समविचारी राजकीय पक्षानी एकत्र येणे आवश्यक आहे. आपला पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याने, या निवडणूका आम्ही आपल्या पक्षासोबत एकत्रितपणे लढवू इच्छितो.

Ajit Pawar suffers setback during election campaign
Devendra Fadnavis: फडणवीसांचा एकाचवेळी नव्वद वार्डात प्रचार; ओवेसी, सुजात आंबेडकरांची पदयात्रा, जाहीर सभांवर जोर!

आमच्याशी सन्मानपूर्वक आघाडी झाली तर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी काही जागा आपण सन्मानपूर्वक दिल्यास, आमची, आपल्या पक्षासोबत एकत्रितपणे लढण्याची तयारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com