

BJP News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. वेळ कमी असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने हायटेक प्रचारावर जोर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकाचवेळी 90 वार्डांमध्ये संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना भाजपने प्रचाराचा हा हायटेक फंडा अवलंबला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगरमध्ये डिजिटल सभा होणार आहे. या सभेचे एकाच वेळी ९० वॉर्डात प्रसारण केले जाणार असल्याचे समजते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याची जय्यत तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या भाजपने मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन केले.
पण ते कुठल्या मैदानात किंवा रस्त्यावर न घेता एका हॉलमधून त्याचे प्रसारण भाजप लढत असलेल्या सगळ्याच प्रभागांमध्ये एकाचवेळी केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक वार्डात मोठे एलसीडी लावण्यात आले आहेत. महापालिकेत मोठा भाऊ होण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही इथे स्वतंत्र लढत आहेत.
भाजपने हायटेक प्रचाराचा फंडा वापरला असला तरी इतर राजकीय पक्षांनी थेट भेट आणि संवादावर भर दिला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवेसी हे शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरून प्रचार रॅली करत आहेत. काल शहरातील जिन्सी भागात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर विरोधकांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर आज ओवेसी यांच्या रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे वंचितचे युवानेते सुजात आंबेडकर यांनीही डोअर टू डोअर प्रचार रॅली आणि सायंकाळी सभा अशा प्रकारे प्रचाराला सुरवात केली आहे. पुढील दोन-तीन दिवसात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एमआयएमचे अकबरोद्दीन ओवेसी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रकाश आंबेडकर अशा नेत्यांच्या सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची दहा जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवगर्जना सभा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.