Ajit Pawar News : अजितदादांचं ठरण्याआधीच आमदारांचं गुडघ्याला बाशिंग

Anna Bansode and Manik Kokate : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या चर्चेला उधाण
Anna Bansode, Manikrao Kokate
Anna Bansode, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे. अशा या वातावरणात पिंपरीचे आमादार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आम्ही अजितदादांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजपमध्ये दाखल होणार असल्याचा दावा केला. दरम्यान, संजय राऊत यांनीही राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचे विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडून अजित पवार भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) आणि माणिकराव कोकाटे यांनी 'जिथं दादा तिथं मी' अशी भूमिका घेतली आहे.

Anna Bansode, Manikrao Kokate
Who is Atique Ahmed: गुन्हेगारी जगतापासून राजकारणाचा प्रवास: कोण आहे अतिक अहमद?

शिंदे-फडणवीस सरकारमधील शिवसेनेच्या १६ आमदारांबाबत उच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता काही बड्या नेत्यांनी वर्तविली आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सर्वांच्या लक्षात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार काही आमदारांसह भाजपमधे जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनसोडे आणि कोकाटे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Anna Bansode, Manikrao Kokate
Ajit Pawar and Anna Bansode : जिथं अजितदादा तिथं मी; आमदार अण्णा बनसोडेंनी स्पष्टच सांगितलं

आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील सर्वांना माहिती आहे की मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. ते उद्या जो निर्णय घेतील तो मला आजच मान्य आहे. दादा जातील तिकडे जाणार. शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे."

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, "अजित पवारांकडे काम करण्याची जी हतोटी आहे ती कुणाकडेही नाही. त्यामुळे आताच्या घडीला टार्गेट करण्यासाठी तेच एक नेते आहे. ते जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र दादा राष्ट्रवादीव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा विचार करणार नाहीत. मात्र ते भाजपमध्ये गेल्यास आम्हीही त्यांच्यासोबत असणार आहोत. दरम्यान हे सरकार काही पडणार नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com