Ajit Pawar News: "मला 'त्या' कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं.." ; अजितदादाचं स्पष्टीकरण

Ajit Pawar on NCP camp : महाविकास आघाडीमधील दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या वाद सुरु आहे,
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar on NCP camp : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विभागीय कार्यकर्ता शिबीर घाटकोपरमध्ये आज (शुक्रवारी) होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरही नेत्यांची नावं आहेत. परंतु यात राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवारांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. अजित पवार यांचे नाव का वगळण्यात आले, यावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar News : कोण संजय राऊत ?; अजितदादांनी वात पेटवली...

घाटकोपरच्या शिबिराला सुमारे दोन ते तीन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना या प्रश्नावरुन छेडण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, "मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते," खासदार संजय राऊत आणि अजित पवार या महाविकास आघाडीमधील दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या वाद सुरु आहे,

Ajit Pawar
MVA Politics: 'मविआ' मध्ये पहिली ठिणगी पडली ; राऊत म्हणाले, 'अजितदादाचं का ऐकून घेऊ ? ; मी शरद पवारांचेच ऐकतो, कुणाच्या बापाला..

यात राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्या समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अजितदादाचे अचानकपणे कार्यक्रमांमधून निघून जाणे, दौरा रद्द करणं अशा बातम्यांमुळे अजितदादा नाराज आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.

पुरंदर येथे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. अजित पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते.

या दौऱ्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच वडकी येथील एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार होते. पण त्यांनी आपला दौरा अचानक रद्द केल्याने ते कुठे गेले यांच्या चर्चा रंगल्या होत्या.

यामुळे अजित पवारांचं नाव वगळलं..

अजित पवार यांचे आधीच काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते या शिबिराला उपस्थित राहणार नसल्याने, त्यांचं या शिबिराच्या प्रसिद्धी पत्रकातून नाव वगळण्यात आल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com