Sanjay Raut Controversy : एकनाथ शिंदेंच्या शिलेदारावर संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले, 'तो चु***...'

Sanjay Raut Criticized Eknath shinde Sanjay Nirupam : राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी आपआपल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा प्रमुख नेते भूमिका मांडतात त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, असे संजय राऊत म्हणाले.
Eknath shinde & Sanjay Raut
Eknath shinde & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. राज-उद्धव ठाकरेंनी महाष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसनेतील नेते यावर आपले मत व्यक्त करत आहेत.

संजय निरुपम यांनी दोन शून्य एकत्र आले तर त्याची बेरीज शुन्यच होते, असा टोला राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चवर लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांची जीभ घसरली.

राऊत म्हणाले, 'तो चु** आहे. त्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाहीये. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शुन्यच येणार आहे. त्यांची गाळण उडालीये. जे बोलत आहेत त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. जे बोलतायेत त्यांची नाव बघा म्हणजे कळले यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही.'

Eknath shinde & Sanjay Raut
Maharashtra Congress: स्थानिक काँग्रेसला नवा चेहरा देण्याची तयारी; संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू

'राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी आपआपल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा प्रमुख नेते भूमिका मांडतात त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. काही लोकांना वेदना होणार कारण राज-उद्धव एकत्र झाले तर त्यांना कायमचे शेतावर जावे लागेल. संघाच्या शाखेत जावे लागेल.', असा टोलाही एकनाथ शिंदेंचे नाव घेता राऊत यांनी लगावला.

'महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणार आहे. दोन भाऊ एकत्र येतील त्यामुळे अनेकांना भीती वाटत आहे. त्यांच्या पोटातून मळमळ बाहेर पडत आहे. पण महाराष्ट्रात एकत्र येऊन हुकुमशाहीविरोधात लढाला आहे, हा इतिहास आहे. त्यात मराठी माणूस पुढे होता.', असेही राऊत म्हणाले.

आम्ही भूतकाळात पाहत नाही...

कोणी काही बोलू द्या, कितीही खाजवत बसू द्या भूतकाळात वळायचा नाही, हा आमचा फाॅर्म्युला आहे. उद्धव साहेबांनी ठरवले आहे की पुढे पाऊल टाकायचे मागे काय बोललो हे पाहायचे नाही. शिवसेना पक्षप्रमुख हे भविष्याचा विचार करणारे आहेत. मराठी माणसाचे भविष्य पाहायचे आहे, असे सांगत मनसेसोबत भूतकाळात काय वक्तव्य केली यावर चर्चा करणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

Eknath shinde & Sanjay Raut
Rahul Gandhi News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींचा अमेरिकेतून गंभीर आरोप, म्हणाले, 'पहाटे तीनपर्यंत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com