Sunetra Pawar on Ajit Pawar Death: जिवाभावाचा माणूस..! अपघाताला एक महिना पूर्ण; सुनेत्रा पवारांची मन हेलावणारी पोस्ट

Ajit Pawar Plane Crash: One Month Completed:जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते असं सुनेत्रा पवार या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे या अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल आज येणार असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे दादांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशीचा एक व्हाट्सअप स्क्रीनशॉट शेअर करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दादा बरोबरचे काही फोटो शेअर आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील दादांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यासोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार म्हणाल्या, माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते.

जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते असं सुनेत्रा पवार या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने “विकासाचे राजकारण” जपले.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Success Story: स्वप्नांचा पाठलाग! 3 मुलांची आई 18 वर्षांचा संसार केल्यानंतर 40 व्या वर्षी बनली अधिकारी

आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील.

अजितदादा सदैव आपल्या स्मरणात..आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील. अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com