Ajit Pawar On Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलवर कारवाई कधी? अजितदादा म्हणाले, 'अमित शहा आलेत...'

Tanisha Bhise death Ajit Pawar Deenanath Mangeshkar Hospital : प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुणीही असा हलगर्जीपणा करता कामा नये, असे अजित पवार म्हणाले
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : तनिषा भिसे हिच्या मृत्यूबाबत आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. धर्मादाय आयुक्तांचा देखील अहवाल आला आहे. त्यामुळे मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी होणार? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, 'माझ्या माहिती प्रमाणे या प्रकरणी दोन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आले आहेत. तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल. मुख्यमंत्री आज (शुक्रवारी) पुण्यात मुक्कामी येणार आहेत. उद्या (शनिवारी) शिवाजी महाराजांची पुण्यतिधी आहे. रायगडावर अमितभाई शहा येणार आहेत. आम्ही रायगडला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर याबाबत मी त्यांना विचारेन'

Ajit Pawar
Sudhir Mungantiwar : "माझ्या प्रमोशनसाठी सरकार टिकलं पाहिजे, पण..."; प्रणिती शिंदे, अरविंद सावंतांचा उल्लेख करत मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

'प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुणीही असा हलगर्जीपणा करता कामा नये. वैद्यकीय क्षेत्रात दोन पैसे कमवण्यापेक्षा सेवाभावी वृत्ती लक्ष्यात घेऊन काम केले पाहिजे.पैशाअभावी कुणाचे उपचार नाकारू नयेत. असे कोण करत असेल तर खपवून घेणार नाही. ', असा इशारा देखील अजित पवारांनी दिला.

आर्थिक संकटावर मार्ग काढू...

एसटी आर्थिक संकटात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्याकडून परिपूर्ति निधी मिळत नसल्याचे सांगत आर्थिक संकटाचे खापर अर्थखात्यावर फोडले होते. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एसटीमध्ये सवलती देत असताना बजेटमध्ये तरतदू करत असतो. देशात, जगात पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हेस कधीच फायद्यात नसते, अशी माझी माहिती आहे. बीओटी तत्वावर जागा देऊन इन्कम वाढवण्याचा प्रयत्न आहे. परिवहन विभागाच्या सरकाऱ्यांशी बोलने तसेच मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल.

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र शिवसेनेच्या आक्षेपानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, अजून याबाबतचा तिढा सुटला नाही. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.

Ajit Pawar
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी अमित शहा भोजन करणार, एकनाथ शिंदेंचा लाडका मंत्री अस्वस्थ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com