जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीबाबत अजितदादांचं मोठं विधान

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank Election) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank election) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अध्यक्ष निवडीबाबत मोठे विधान केले आहे. मी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) जो निर्णय घेऊ तो सर्व संचालकांना मान्य आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले की, जिल्हा बँकेवर 21 जणांची निवड झाली आहे. त्यातील काही जण बिनविरोध तर काही निवडणुकीच्या माध्यमातून संचालकपदावर आले. दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि संजय जगताप आणि काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली आहे. मी आणि दिलीप वळसे पाटील जो निर्णय घेऊ तो मान्य असेल असे संचालकांनी म्हटले आहे. जिल्हा बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल.

Ajit Pawar
काँग्रेसचा आमदार घसरला कंगनाच्या गालावर अन् व्हिडीओ झाला व्हायरल!

दरम्यान, बँकेचे विद्यमान अध्यक्ष व सर्वांत जेष्ठ संचालक रमेशआप्पा थोरात (Ramesh Thorat) यांनी म्हटले होते की, निवडीसाठी आज सकाळी १० वाजता जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित केले आहे. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार बँकेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरवणार आहेत. त्यामुळे बाकी कोणाचे लॉबिंग किंवा कोणाच्या नावाच्या सर्वाधिक चर्चा आहेत याला काहीही महत्व नाही.

Ajit Pawar
गर्दी राजकीय पक्षाची अन् आयोगाचा पोलीस अधिकाऱ्याला दणका; तातडीनं केलं निलंबित

सध्या जिल्ह्यात ५ संचालकांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा आहे, मात्र अशा चर्चांना काहीच अर्थ नाही. जिल्ह्याचा सर्वांगिण विचार करुन अजित पवार अध्यक्षपदाचा निर्णय घेतील. निवडीच्या दिवशी सकाळी १० वाजता निर्णय होणार असून त्याबाबत सर्व संचालकांना कळविले आहे, असे थोरात नुकतेच म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com