Pune Politics : अजित पवार यांच्यासोबतचे अनेक आमदार फुटणार; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Big Statement on Ajit Pawar Supporters : आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे...
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSararnama
Published on
Updated on

Rohit Pawar on Ajit Pawar :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार रोहित पवार हे सातत्याने अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असताना दिसत आहेत. राष्ट्रवादीतील इतर नेते अजित पवारांवर टीका करताना सावध पवित्रा घेत असले तरी रोहित पवार अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवत आहेत. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार आज हडपसर मतदारसंघामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते. या भागामध्ये कर्जत-जामखेड परिसरातील अनेक लोक राहतात. त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे Rohit Pawar यांनी सांगितले. लोकनेता बनणं सोपं नसतं. त्याला लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि तो पवारसाहेबांनी संपादन केला आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना टोला लगावला.

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar News : आधी शिरूर अन् आता मंचर, अजितदादांचा कोल्हेंवर तिखटवार; 'तीन पक्ष फिरून आलेल्या बोलघेवड्याने...'

सध्याच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवीन इन्व्हेस्टमेंट येत नाही. नवीन तरुणांना रोजगार द्यायचे असतील तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आणावी लागेल, पण यासाठी हे सरकार कुठेतरी कमी पडत आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

अमोल कोल्हे यांच्याबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत नागरिकांचा प्रश्नांवर चांगला आवाज उठवला आहे. अमोल कोल्हे प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि शिरूर लोकसभेतील लोकांचा विश्वास हा डॉक्टर अमोल कोल्हेंवर आहे, असे सांगत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादा डिस्टर्ब आहेत की नाही हे माहीत नाही. पण त्यांच्या पक्षातील अनेक आमदार हे भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर काही आमदार हे लोकसभा निवडणुका झाल्यावर पवारसाहेबांबरोबर दिसतील. अमोल कोल्हे यांचा नगरमध्ये कार्यक्रम सुरू आहे ते अप्रत्यक्षपणे नीलेश लंके यांना मदत करत आहेत, त्यामुळे लंके यांच्या उमेदवारीचा मुद्दा हा डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच माहिती असेल. हळूहळू पुन्हा सर्व बॅनरवरती शरद पवारांचे फोटो दिसतील, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याबाबतही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. लोकशाही टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांसारखे नेते हे महाविकास आघाडीबरोबरच येतील. काही जागांवर बोलणी सुरू आहे, ती लवकरच पूर्ण होतील. तसेच भाजप ज्या पक्षाला जवळ करतो, त्या पक्षाला हळूहळू संपवत आला आहे. जानकर साहेब येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीबरोबर येत आहेत का नाही ते कळेल, असे रोहित पवार म्हणाले.

R

Ajit Pawar, Rohit Pawar
Amol Kolhe on Ajit Pawar: 'शिरूर'साठी आढळरावांना हाताशी धरणाऱ्या अजितदादांवर कोल्हेंचा जिव्हारी लागेल असा घाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com