Amol Kolhe on Ajit Pawar: 'शिरूर'साठी आढळरावांना हाताशी धरणाऱ्या अजितदादांवर कोल्हेंचा जिव्हारी लागेल असा घाव

Shirur Loksabha Election 2024 : शिरूर मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिल्यानंतर शिरूरची जागाही मागून घेतली आहे.
Ajit Pawar and Amol Kolhe
Ajit Pawar and Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Shirur Loksabha News : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. यातच जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. यातच शिरूर मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिल्यानंतर शिरूरची जागाही मागून घेतली आहे.

एकीकडे शिरूरमधले अजितदादांचे दौरे वाढले असतानाच त्यांनी कोल्हेंना पाडण्यासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधक असलेल्या माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटलांना हाताशी धरले आहे. यातच त्यांनी आम्ही जो उमेदवार देऊ तो शंभर टक्के निवडून आणू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. अशातच आता कोल्हेंनीदेखील अजितदादांच्या वर्मी घाव घालण्यास सुरुवात केली आहे.

Ajit Pawar and Amol Kolhe
Amol Kolhe News : "उमेदवारी देऊन चूक केली", अजितदादांच्या विधानावर कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, "10 वेळा..."

महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंना ठरवून पाडल्याचा इतिहास असलेल्या अजितदादांनी यंदाच्या लोकसभेला कोल्हेंना ठरवून पाडण्याचा मनसुबा स्पष्ट केला आहे, तर दुसरीकडे कोल्हेंनीही अजितदादांच्या टीकेला जोरदार पलटवार करतानाच मतदारसंघात तळ ठोकला आहे.

अशातच आता खासदार अमोल कोल्हेंनी 'एक्स'वरून अजित पवारांच्या जिव्हारी लागेल असा टीकेचा बाण सोडला आहे. मंचर येथील पोलिस स्टेशन इमारत, निवासस्थान, घोडेगाव येथील पोलिस अधिकारी व अंमलदार निवासस्थान बांधकामांचे उद्घाटन कार्यक्रमाच्य पत्रिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, परंतु निमंत्रण पत्रिकेत “वेळ”च लिहिली नाही. ’घड्याळ’ बंद पडले की काय 😳... असो! असा टोला लगावतानाच पोलिस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागत “तुतारी” वाजवून करायला विसरू नका, असा चिमटा कोल्हेंनी या वेळी काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी 'एक्स' अकाउंटवर व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले 'अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही, असं मी कायम बोलत आलो आहे. पण, अजित पवारांच्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. पण राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यातील एकाही खासदारास संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं मी ऐकलं नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha News) नागरिकांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळाला आहे," असं कोल्हे म्हणाले.

"मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो, मग संसदेत अनुपस्थितीत होतो का? प्रश्न मांडणं बंद केलं होतं का? आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ( सुनील तटकरे ) हे रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या प्रदेशाध्यक्षापेक्षाही माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही उजवी आहे," असा टोला कोल्हेंनी लगावला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते...?

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिरूर लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अजित पवार म्हणाले, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच.

मध्यंतरी शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली.

R

Ajit Pawar and Amol Kolhe
Loksabha Election 2024 : बारामतीतील वाद मुंबईत मिटणार! आजी-माजी आमदारांची नाराजी दूर होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com