Ajit Pawar On Swargate Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आरोपीला फाशीच...

Ajit Pawar Swargate Crime Police :पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन दिवसांत काय कारवाई केली याचा अहवाल अजित पवार यांनी मागवला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेट एसटी स्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड करण्यात आली.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन दिवसांत काय कारवाई केली याचा अहवाल अजित पवार यांनी मागवला आहे. दोन दिवसातील कारवाईचा सविस्तर अहवाल पोलिसांकडून देण्यात आला असून हा अहवला सीएमओला देखील देण्यात येणार आहे.

अजित पवारांना तपासात काय प्रगती काय झाली याची माहिती देण्यात येईल. तसेच तरुणीचा मेडिकल अहवाल आला आहे त्याच्या विषयी देखील माहिती देण्यात येणार आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. अजित पवारांनी ट्विटवरून या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आरोपीला फाशी शिवाय दुसरी शिक्षाच असू शकत नाही, असे म्हटले आहे.

Ajit Pawar
Shivsena News : पुण्यात एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला 'तो' आमदार लागला शिवसेनेच्या गळाला

आपल्या ट्विटमध्ये अजित पवारांनी म्हटले आहे की, 'पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.'

आपल्या ट्विटमध्ये अजित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो.पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.',

Ajit Pawar
MP Kalyan Kale News : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लावले सगळ्यांना कामाला, खासदार कल्याण काळेंनी घेतली बैठक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com