Ajit Pawar News : 'पुढच्या पिढीने पक्षाचं काम हाती घेतलं, म्हणजे काही त्यांनी..' ; अजित पवारांचं बारामतीत विधान!

Baramati Lok Sabha Constituency : '...त्यामुळे आता सासू-सासऱ्यांनी घरी बसलं पाहिजे अन् सुनेला काम करू दिलं पाहिजे' , असंही अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sulesararnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारसंघावर दावे सांगितले जात, इच्छुकांचे रुसवे-फुगवेही पाहायला मिळत आहेत. अशात काही ठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या अनेक राजकीय भूकंपांमुळे राजकीय परिस्थिती पूर्णता बदलली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पडलेली फूट आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागणं. तसेच सत्तेवर आलेलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार यांचा समावेश होतो. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच मतदारसंघांमध्ये सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यंदा बारामतीचा गड पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामधील निवडणूक आता त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यासाठी अजित पवार बारमती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. बुधवारी त्यांनी बारामतीमध्ये आजी-माजी पक्ष पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत, त्यांना मार्गदर्नशन केलं. शिवाय, या वेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.

Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Ajit Pawar Vs Supriya Sule : 'मी केलेल्या कामांचे फोटो खासदारांच्या कार्य अहवालात' ; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा!

अजित पवार म्हणाले, 'मी पक्ष चोरला असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ त्यांनी पक्ष चोरला असं होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे, आज 80 टक्के आमदार माझ्यासोबत येतात, आमच्या विचाराची भूमिका घेतात, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल, म्हणूनच ते आमदार येतात ना? सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामोल्लेख टाळून शरद पवार यांना केल्याचे दिसून आले.

याचबरोबर ते म्हणाले, 'मी दमदाटी करतो असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी कधीच दम दिला नाही. ज्यांच्यावर माझा हक्क आहे, त्यांच्याकडे मी काही मागितले, विनंती केली तर त्याला दम म्हणता येणार नाही. आज तुम्हाला जे भावनिक करत आहेत, त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते काय तुमचा विकास करू शकणार?' असा सवाल करत, अजित पवारांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंचा नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

Ajit Pawar, Sharad Pawar,  Supriya Sule
Ajit Pawar Speech : दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा वाटलो का?: अजितदादांचा सुळेंना टोला

याशिवाय शरद पवारांच्या(Sharad Pawar) नावाचा उल्लेख न करता 'राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावरही त्यांनी गळ टाकला होता. पण त्यांच्या गळाला मासा लागण्याच्या आधीच आम्ही मासाच बाजूला नेला होता, त्यामुळे त्यांच्या गळ्याला हा मासा लागू शकला नाही. मला त्यांना सांगायचं आहे की, चार दिवस जसे सासूचे असतात, तसेच चार दिवस सुनेचे असतात, त्यामुळे आता सासू-सासऱ्यांनी घरी बसले पाहिजे आणि सुनेला काम करू दिले पाहिजे. जास्त नाही पण पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचं काम खंबीरपणे करू शकतो, त्यामुळे कोणाला साथ द्यायची याचा निर्णय बारामतीकरांनी करायचा आहे,' असं अजित पवारांनी सांगितलं

अजित पवार(Ajit pawar) म्हणाले, जास्त नाही पण पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचं काम खंबीरपणे करू शकतो, त्यामुळे कोणाला साथ द्यायची याचा निर्णय बारामतीकरांनी करायचा आहे. या निवडणुकीत तुम्ही मला साथ दिली नाही तर मीही तुम्हाला साथ देणार नाही, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. कारण एवढे करून जर पालथ्या घड्यावर पाणी असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्या या वाक्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com