Ajit Pawar Vs Supriya Sule : 'मी केलेल्या कामांचे फोटो खासदारांच्या कार्य अहवालात' ; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा!

Baramati Lok Sabha Constituency : भावनिक न होता विकासाला मतदान करण्यासाठी घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.
Ajit Pawar Vs Supriya Sule
Ajit Pawar Vs Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बारामती येथे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. बारामतीमध्ये शंभर टक्के विकासकामं मी केली असून, या विकासकामांचे फोटो विद्यमान खासदार आपल्या कार्य अहवालात वापरत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, माझ्याकडे आमदारकी असताना मला खासदारकी कशाला हवी? असं काही लोक म्हणतील, पण मला खासदारकी केंद्रातून निधी आणायला हवा आहे. केंद्राचा निधी आणला तर यापेक्षा कित्येक पटीने बारामतीचा विकास होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar Vs Supriya Sule
Ajit Pawar Speech : दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा वाटलो का?: अजितदादांचा सुळेंना टोला

याचबरोबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना घर देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याकडून करण्यात येत आहे. नुकतच सोलापूर येथे 30000 घरांचे वाटप करण्यात आलं. लोकसभा मतदारसंघात आपला खासदार असल्यास या प्रकारच्या योजना बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला आणता येतील. याबाबतच्या योजनांचे प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी माझी तर केंद्रातून ते मंजूर करून घेण्याची जबाबदारी आम्हा दोघा नवरा-बायकोची असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी 'नमो रोजगार' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामधून बऱ्याच मुला-मुलींना रोजगार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, दहा हजारपेक्षा जास्त मुला मुलींना रोजगार मिळाला. 10 हजार हा काही आकडा छोटा नाही. परंतु काहींनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि फक्त दहा हजार लोकांना रोजगार दिला अशी टीका केली. मात्र, त्यांनी कधी 1000 तरुणांना तरी रोजगार दिलाय का? असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना केला.

Ajit Pawar Vs Supriya Sule
Sangli Lok Sabha Constituency : मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’

अजित पवार म्हणाले, बारामती शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शंभर टक्के विकासकामं मी केली आहेत. मात्र, काही लोकांनी त्यांच्या कार्य अहवालात ही कामं आम्हीच केल्या असल्याचं छापलं आहे. सध्याच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक वाचायला मिळालं त्यामध्ये नव्या नगरपालिकेच्या इमारतीचे निधी देण्यापासून ते डिझाइन करण्यापर्यंत सर्व कामं मी केली, त्या श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं टीका अजित पवार यांनी केली.

तसंच भावनिक न होता विकासाला मतदान करण्यासाठी घड्याळाच्या उमेदवाराला निवडून देण्याचा आवाहनही अजित पवार यांनी या वेळी उपस्थितांना केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com