NCP Politics : पुण्यासाठी मुंबईत खलबतं ! अजितदादा घेणार 'टफ कॉल', शहराध्यक्षपदासाठी 'या' नावांची चर्चा!

Pune NCP City President : महापालिका निवडणुका तोंडावरती असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पक्षांच्या वरिष्ठांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराचा नवा कारभारी कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काही नाव सध्या शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यातील एक नाव निवडण्याचा टफ कॉल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घ्यावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्व पदाधिकारी असलेल्या शंतनु कुकडे याला परदेशी महिलेने दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आले आहे. कुकडे याला अटक केल्यानंतर पोलिस तपासामध्ये त्याच्यात आणि मानकर यांच्यामध्ये काही कोटींचे व्यवहार झाले असल्याचे समोर आले होते. दीपक मानकर यांनी व्यवहारासंदर्भात पोलिसांना सादर केलेली कागदपत्र बनवाट असल्याचे समोर आले. त्यानंतर दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस चौकीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar News
Arun Gawli: 'डॅडी' निर्दोष, पण मुक्काम जेलमध्येच राहणार; डॉन दाऊदच्या शार्प शुटरला जामीन

मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी "माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोप करत शहराध्यक्षपदाचा राजीनामा अजित पवारांकडे राजीनामा दिला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारू नका, अशी देखील मागणी केली आहे.

पालिका निवडणुकीसाठ नवे नेतृत्व?

दरम्यान पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका तोंडावरती असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेची चांगली जाण असणाऱ्या नेत्याची शहराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.

यासंदर्भात बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावांसह अन्य नावांची चर्चा करण्यात आली.तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहराध्यक्षपदी बढती द्यावी का याबाबत देखील पक्षाने विचार केला आहे.

जगताप,धनकवडेंच्या नावावरही चर्चा

शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून विचाराधीन असलेल्या नावांमध्ये महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते राहिलेले तसेच दुसऱ्यांदा हडपसरमधून आमदार झालेले चेतन तुपे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर आहे. मात्र शहरातील एकमेव आमदाराकडे अजितदादा शहराचे नेतृत्व देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच वडगाव शेरीचे माजी आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्ती असलेले सुनील टिंगरे शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याचे बोलले जात आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते असलेल्या सुभाष जगताप यांच्या नावाची देखील चर्चा शहराध्यक्षपदासाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar News
Foxconn Project : महाराष्ट्राचे राजकारण पेटवणारा प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या झोळीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com